महाराष्ट्र

maharashtra

घरी तयार केलेल्या 'पल्म पुडींग'ने बनवा तुमचा ख्रिसमस खास

By

Published : Dec 19, 2020, 12:38 PM IST

'नावात काय आहे?', असे प्रख्यात इंग्रजी नाटककार विल्यम शेक्सपिअरने म्हटले आहे. म्हणजे नाव पाहण्यापेक्षा एखाद्या घटकाची गुणवत्ता पहा, असे या वाक्यातून त्याला सांगायचे होते. आता तुम्ही म्हणाल की, पल्म पुडींग आणि शेक्सपिअरचा काय संबंध? या पदार्थाचे नाव पल्म पुडींग आहे मात्र, यात कुठलेही पल्म वापरले जात नाही. आता ज्याला आपण 'पल्म पुडींग' म्हणून ओळखतो. त्याला शेकडो वर्षांपूर्वींचा इतिहास आहे. फक्त त्यावेळी त्याचे नाव वेगळे आहे. १३व्या शतकात उदयाले आलेला हा खाद्यपदार्थ १७ व्या शतकात तो 'ख्रिसमस पुडींग' नावाने प्रसिद्ध झाला. पुढे १८ व्या शतकात त्याला 'पल्म पुडींग' हे नाव मिळाले. खाद्य पदार्थ अभ्यासकांच्या मते, व्हिक्टोरियन कालखंडात सुकवलेली फळे आणि त्यांचा सुकवलेला गर खूपच चवीने खाल्ला जात होता. त्यामुळे यांचा वापर करून जो गोड पदार्थ तयार केला जाई, त्याला पल्म पुडींग किंवा पल्म केक, असे म्हटले जाई. काळाच्या ओघात हे पुडींग बनवण्याच्या पद्धतीमध्ये अनेक बदल झाले मात्र, त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. हीच लोकप्रियता लक्षात घेऊन आमच्या 'ख्रिसमस स्पेशल रेसिपी' या खाद्यपदार्थ शृखंलेची सुरुवात आम्ही 'पल्म पुडींग'पासून करत आहोत. ही रेसिपी तुम्ही अवश्य ट्राय करून पहा आणि आम्हाला प्रतिक्रिया कळवा. आणखी रुचकर खाद्यपदार्थ रेसिपींसाठी 'ईटीव्ही भारत'ला फॉलो करत रहा, तोपर्यंत 'हॅप्पी कुकिंग'!

ABOUT THE AUTHOR

...view details