महाराष्ट्र

maharashtra

Motorcycle Rally On Gudi Padwa : अकोलेकरांनी मोटारसायकल रॅली काढून केले नववर्षाचे स्वागत

By

Published : Apr 2, 2022, 5:10 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

अकोला - गुढीपाडव्यानिमित्त आज पहाटे राजराजेश्वर मंदिरापासून संस्कृती संवर्धन समितीच्या मार्फत हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिकांच्या उपस्थितीमध्ये बाईक रॅली ( Motorcycle Rally On Gudi Padwa in Akola ) काढण्यात आली. या रॅलीमध्ये आमदार व इतरही लोक प्रतिनिधी सहभागी झाले होते. महिलांनी व नागरिकांनी पारंपरिक वेश परिधान करीत या रॅलीची शोभा वाढवली. शहरातील मुख्य मंदिरांमध्ये जाऊन नवीन ध्वज देऊन या बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला. शांततेच्या मार्गाने ही रॅली काढण्यात आली. हिंदू नववर्षाच्या निमित्ताने तसेच गुढीपाडव्याच्या स्वागताचे औचित्य साधून संस्कृती संवर्धन समितीतर्फे अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून बाईक रॅली काढण्यात आली. पारंपारिक वस्त्र परिधान करीत महिलांनी या बाईक रॅलीमध्ये पुढाकार घेतला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details