महाराष्ट्र

maharashtra

वणीत डॉक्टरांवर धारदार शस्त्राने हल्ला

By

Published : Apr 5, 2021, 9:56 PM IST

डॉ. मत्ते हे नेहमी प्रमाणे आपल्या क्लीनिकमध्ये रुग्ण तपासत होते. तीन वाजताच्या सुमारास 2 ते 3 हल्लेखोर दुचाकी (एम.एच.29 बी.जी. 2950) ने आले. दुचाकी दवाखान्यासमोर लावून दवाखान्यात शिरले. आत शिरताच त्यांनी धारदार शास्त्राने डॉ. मत्ते यांच्यावर वार केले.

डॉक्टरांवर हल्ला
डॉक्टरांवर हल्ला

यवतमाळ - वणी येथील यात्रा मैदान परिसरात डॉ. पद्माकर मत्ते हे नेहमीप्रमाणे रुग्ण तपासत असताना रुग्ण म्हणून आलेल्या दोन ते तीन हल्लेखोरानी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. डॉ. मत्ते यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या घटनेचा तपास पोलीस करत आहे.

डॉ. मत्ते हे नेहमीप्रमाणे आपल्या क्लीनिकमध्ये रुग्ण तपासत होते. तीन वाजताच्या सुमारास 2 ते 3 हल्लेखोर दुचाकी (एम.एच.29 बी.जी. 2950) ने आले. दुचाकी दवाखान्यासमोर लावून दवाखान्यात शिरले. आत शिरताच त्यांनी धारदार शास्त्राने डॉ. मत्ते यांच्यावर वार केले. यात डॉ. मत्ते यांच्या डोळ्याला, पोटावर आणि पाठीवर गंभीर जखम झाली आहे. यावेळी दवाखान्यात उपस्थित रुग्णात चांगलीच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शीनी तातडीने पोलिसांना सूचित केले. पोलीसांनी घटनेचे गांभीर्य बघता घटनास्थळ गाठले. त्यानंतर डॉ. मत्ते यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची चर्चा
काही दिवसांपूर्वी डॉ. मत्ते यांच्या क्लीनिकमध्ये उपचारासाठी आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी मृतकाच्या नातेवाईकांनी क्लीनिक वर हल्ला चढवत डॉक्टरला मारहाण केली होती.त्याच प्रकरणातून ही घटना घडल्याची चर्चा आहे. मात्र, या घटनेचा पोलीसांकडून तपास सुरु आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details