महाराष्ट्र

maharashtra

Yavatmal Two Group Fight : शेंबाळपिंपरी गावात दोन गटात तणाव; दगडफेकीत 10 जखमी

By

Published : Jan 14, 2022, 12:12 PM IST

Updated : Jan 14, 2022, 12:24 PM IST

यवतमाळमधील शेंबाळपिंपरी गावात दोन गटांत दगडफेक ( Yavatmal Shembalpimpri Two Group Fight ) झाली आहे. यादगडफेकीत 10 जण जखमी झाले आहेत. पोलीस आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Yavatmal Two Group Fight
शेंबाळपिंपरी गावात दोन गटात तणाव

यवतमाळ - यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी गावात फलक काढण्याच्या वादातून दोन गटात तुफान ( Yavatmal Shembalpimpri Two Group Fight ) दगडफेक झाली. यामध्ये सरपंच सहित आठ ते दहा जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पोलीस पथक आणि तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच, दंगल नियंत्रक पथकही घटनास्थळी पोहचले आहे.

शेंबाळपिंपरी गावात दोन गटात तणाव

शेंबाळपिंपरी गावात फलक काढण्याच्या वादातून दोन गटांत तणाव निर्माण ( Shembalpimpri Two Group Fight ) झाला. त्याचे रुपांतर नंतर दगडफेकीत झाले. या दगडफेकीत सरपंचासोबत आठ ते दहा जखमी झाले आहे. यात पोलिसांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. सद्यस्थितीत गावातील गडफेक बंद आहे. या घटनेमुळे शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद झाली असून, मात्र तणावपूर्ण वातावरण आहे. पुसद, उमरखेड, यवतमाळ येथून शेंबाळपिंपरीत एसआरपीएफची एक तुकडी पाठवण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, स्थनिक गुन्हे शाखा गावात दाखल झाले आहे.

हेही वाचा -Namvistar Din : १७ वर्षांचा लढा, अनेकांनी गमावले प्राण, अन् झाला नामविस्तार 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

Last Updated :Jan 14, 2022, 12:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details