महाराष्ट्र

maharashtra

एएसआयचा मुलगा बनणार आयपीएस.. यवतमाळच्या तरुणाने UPSC परीक्षेत मिळवली 499 वी रँक

By

Published : Sep 25, 2021, 3:30 PM IST

Updated : Sep 25, 2021, 4:28 PM IST

Son of police constable to become IPS

पोलीस सहा. निरीक्षकाच्या मुलाने युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून थेट आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत तरुणाने हे यश संपादन केले आहे. श्रीकांत रामराव मोडक असे या युवकाचे नाव असून त्याने शुक्रवारी जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगा परीक्षेच्या निकालात 499 रँक मिळवली आहे.

यवतमाळ - वडील पोलीस खात्यात एएसआय असल्याने लहानपणापासूनच मनावरती आपणही पोलीस खात्यात जाऊन सेवा करावी, असे स्वप्न उराशी बाळगले होते. लहानपणी बाळगलेले स्वप्न आज साकार होताना दिसत आहे. वडील एएसआय म्हणून नुकतेच निवृत्त झाले. तर मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले आणि त्याला आयपीएस रॅंक मिळेल याची शंभर टक्के खात्री आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी हे यश संपादन केले. श्रीकांत रामराव मोडक असे या युवकाचे नाव असून त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 499 रँक मिळवली.

एएसआयचा मुलगा बनणार आयपीएस..
पाचव्या प्रयत्नमध्ये मिळविले यश -
श्रीकांत याने खासगी कंपनीत नोकरीवर असताना त्याने परीक्षा दिली. त्यात यश आले नाही. आणि त्याने नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णपणे यूपीएससीचा अभ्यास करण्याचे ठरविले. यवतमाळमध्ये राहून एक वर्षं युपीएससीची तयारी केली. त्यानंतर त्याने थेट दिल्ली गाठून अभ्यास केला. श्रीकांतने आतापर्यंत चार वेळा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. यात एक वेळ 3 गुणांनी मुलाखतीपासून वंचित राहिला. मात्र त्याने जिद्द सोडली नाही आणि पाचव्या प्रयत्नात त्याने परीक्षा उत्तीर्ण केली व मुलाखतीपर्यंत पोहोचला. नुकत्याच लागलेल्या निकालमध्ये त्याला 499 रँक मिळाली. त्यामुळे आपल्याला आयपीएस हे कॅडर मिळेल असा त्याला ठाम विश्वास आहे.
पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा बनणार आयपीएस..
ग्रामीण भागातून झाले शिक्षण -
श्रीकांत मोडक याचे दहावीपर्यंत शिक्षण पुसद येथील कोषटवार महाविद्यालयातून झाले. तर बारावीही लातूर येथील राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयातून केले. त्यानंतर इंजिनिअरिंग पुणे येथील सिंहगड महाविद्यालयातून तर एमटेक गुजरातमधील गांधीनगर येथून त्याने पूर्ण केले. लहानपणापासूनच हुशार असल्याने स्कॉलरशीपवरतीच त्याने आपले शिक्षण पूर्ण केले.


हे ही वाचा -UPSC 2020 RESULT मुंबई आयआयटीचे विद्यार्थी शुभम कुमार देशात प्रथम; 761 उमेदवार उत्तीर्ण


सेल्फस्टडीवर दिला भर -

साधारणत: युपीएससीची परीक्षा म्हणजे क्लासेस लावणे आणि त्यातून अभ्यास करणे हाच सर्वांचा समज आहे. मात्र कुठल्याही प्रकारचे क्लासेस न लावता केवळ सेल्फ स्टडीज आणि लायब्ररीमध्ये अभ्यास आणि रिव्हीजन करणे हेच मी आजपर्यंत केले. आजपर्यंतच्या काळामध्ये जे युपीएससी टॉपर आहेत, त्यांनी ज्या पद्धतीचा अवलंब केला तोच मी केला. इतर वेगळी कुठलीही पद्धती वापरली नसल्याचे मोडक यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

Last Updated :Sep 25, 2021, 4:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details