महाराष्ट्र

maharashtra

यवतमाळ : शासकीय रुग्णालयात थैलेसीमिया रुग्णांसाठी बेड नसल्याने नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

By

Published : Sep 2, 2021, 12:39 AM IST

शासकीय रुग्णालयात बालरुग्ण कक्षामध्ये दाखल झालेल्या रुग्णांना जागा शिल्लक राहिली नाही. थैलेसीमिया, सिकलसेलच्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी आज अधिष्ठाता यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले.

yavatmal
yavatmal

यवतमाळ -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नाही. असे असताना मागील काही दिवसांपासून डेंग्यू, व्हायरल ताप, निमोनिया आजाराने जिल्ह्यांत डोके वर काढले आहे. परिणामी शासकीय रुग्णालयात बालरुग्ण कक्षामध्ये दाखल झालेल्या रुग्णांना जागा शिल्लक राहिली नाही. थैलेसीमिया, सिकलसेलच्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी आज अधिष्ठाता यांच्या दालनासमोरच ठिय्या देऊन गंभीर प्रश्नाला वाच्यता फोडली.

yavatmal

बहुतांश रुग्णांना डेंग्यू व सदृश लक्षणे -

यवतमाळ शहरासह ग्रामीण भागात डेंगू सदृश्य आजारासह इतर आजाराचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालया सोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही रुग्णांची मोठी गर्दी दिसत आहे. शासकीय रुग्णालयात ओपीडीमध्ये दिवसाला दोन ते अडीच हजारांच्यावर रुग्णांची नोंद होत आहे. यातील बहुतांश जणांना डेंग्यू व सदृश लक्षणे दिसून येत आहे. यामध्ये लहान बालकांची संख्या अधिक आहे. दरम्यान, वसंतराव नाईक शासकीय वार्ड क्रमांक 10 व 11 हा बाल रुग्ण कक्ष आहे. हा कक्ष सध्या बाल रुग्णांनी हाउसफुल्ल झालेला आहे. विशेष म्हणजे आज प्रत्यक्ष या वार्डची पाहणी केली असता एका बेडवर एक दोन नव्हे, तर तब्बल तीन-चार रुग्ण उपचार घेत आहे. शिवाय रुग्णांना जागा उपलब्ध नसल्याने बाहेर व्हरांड्यातदेखील काही रुग्ण बेड खाली होण्याच्या प्रतीक्षेत दिसून आले. विशेष म्हणजे थैलेसीमिया, सिकलसेल रुग्णांना स्वतंत्र वार्डची व्यवस्था नसल्याने याच ठिकाणी वार्ड क्रमांक 10 व 11 मध्ये रक्त देऊन उपचार करण्यात येतात. त्यामुळे थैलेसीमिया, सिकलसेल रुग्णांना इतर आजारची लागण होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी बालरुग्ण कक्षात बेडची उपलब्धता करून द्यावी व थलॅसीमियाच्या रुग्णांना स्वतंत्र उपचाराची व्यवस्था करून देण्यात यावी, या मुख्य मागणीला घेऊन संतापलेल्या पालकांनी अधिष्ठाता मिलिंद कांबळे यांच्या दालनासमोर ठिय्या देऊन रोष व्यक्त केला.

हेही वाचा -अनिल देशमुख यांचे जावई आणि वकील सीबीआयच्या ताब्यात, नोंदवले जबाब

ABOUT THE AUTHOR

...view details