महाराष्ट्र

maharashtra

यवतमाळ : मेव्हण्याला वाचवायला गेलेल्या जावयाचा विहिरीत बुडून मृत्यू

By

Published : Sep 3, 2021, 12:30 AM IST

मेव्हण्याला वाचवायला गेलेल्या जावयाला आपला जीव गमवाला लागला. ही घटना पुसद तालुक्यातील पार्डी रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली.

yavatmal
yavatmal

यवतमाळ -मनोरुग्ण मेव्हण्याने विहिरीत उडी घेतल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या जावाईला पोहता येत नसल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. रामदास बळीराम महाराज (केवटे), असे या मृत्यू झालेल्या जावाईचे नाव आहे. ही घटना पुसद तालुक्यातील पार्डी रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली. दरम्यान, मेव्हण्याला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे.

पोहणे येत नसताना विहीरीत मारली उडी -

रामदास बळीराम महाराज (केवटे) रा. पार्डी येथील चिमा देवी संस्थांमध्ये महाराज म्हणून काम करत होते. तसेच तो पार्डी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षही होते. त्यांचा मेहुणा विकास साहेबराव खंदारे रा. लोहारा (ई) हा बुधवारी त्यांच्या घरी आला. मनोरुग्ण असल्याने त्याने मंदिरालगतच्या खोल विहिरीत उडी घेतली. हे पाहून रामदास महाराज (केवटे) यांनी स्वतः पोहणे येत नसताना विहीरीत उडी मारली. अंधार असल्याने त्यांला काढणे अशक्य होते. त्यातच रामदास गाळात अडकल्याने वर येऊ शकले नाही. पुसद पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा - मराठा आरक्षणप्रश्नी छत्रपती खासदार संभाजीराजेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट, सर्व पक्षांचे प्रतिनिधी होते उपस्थित

ABOUT THE AUTHOR

...view details