महाराष्ट्र

maharashtra

विविध प्रलंबित मागण्यांसाठी वाशिमच्या पोहरादेवीत 'शोले स्टाईल' आंदोलन

By

Published : Oct 6, 2020, 10:40 PM IST

Updated : Oct 7, 2020, 7:30 PM IST

विविध मागण्यांसाठी मंगळवारी वाशिमच्या पोहरादेवी सर्कलमध्ये शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाच्यावतीने अनेक अधिकारी आणि पोलिसांचा बंदोबस्त याठिकाणी लावण्यात आला होता.

sholay style agitation (pohradevi, washim)
शोले स्टाईल आंदोलन (पोहरादेवी, वाशिम)

मानोरा (वाशिम) -तालुक्यातील पोहरादेवी सर्कलमधील अपंग, विधवा महिला, शेतकरी यांच्या मागण्यासंदर्भात अनेक वेळा जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊनही मागण्यांना केराची टोपली दाखवण्यात येत आहे. यामुळे या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. महंत रमेश महाराज यांनी हे आंदोलन केले.

शोले स्टाईल आंदोलन करताना महंत रमेश महाराज.

पोहरादेवी सर्कलमध्ये जंगल आहे. वन्यप्राणी शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी करीत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

प्रशासनाच्यावतीने अनेक अधिकारी व पोलिसांचा या टाकीजवळ बंदोबस्त लावण्यात आला होता. प्रशासनाच्या आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

तसेच या सर्व मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करणार असल्याचे आंदोलनकर्त्याने यावेळी सांगितले.

Last Updated : Oct 7, 2020, 7:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details