महाराष्ट्र

maharashtra

EXCLUSIVE: समीर वानखेडे यांच्या मूळ गावी ईटीव्ही भारत, कुटुंबांनी नावाबाबत दिले 'हे' स्पष्टीकरण

By

Published : Oct 25, 2021, 3:08 PM IST

Updated : Oct 25, 2021, 3:51 PM IST

समीर वानखेडे कुटुंब

तुम्हाला खरी माहिती घेण्यासाठी माझ्या मूळ गावी जा आणि तपासा, असे वानखेडे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या काका राहत असलेल्या घरी जाऊन त्यांच्याशी ईटीव्हीच्या प्रतिनिधीने संपर्क केला. त्यावेळी शंकरराव वानखेडे यांनी मूळ कागदपत्रे दाखवित खुलासा केला आहे.

वाशिम- एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा जन्मदाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये समीर दाऊद वानखेडे असे लिहिलेले आहे. त्याबाबत समीर यांचे वाशिममधील काका शंकरराव वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जन्मदाखला खोटा असल्याचे समीर वानखेडे यांनी म्हटले आहे. या खोडसाळपणा विरोधात न्यायालयात आव्हान देणार असल्याचा इशारा समीर वानखेडे यांनी दिला आहे. आपल्याबाबत खोटे दस्ताऐवज प्रसिद्ध केले जात असल्याचाही त्यांनी दावा केला आहे. तुम्हाला खरी माहिती घेण्यासाठी माझ्या मूळ गावी जा आणि तपासा, असे वानखेडे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले होते. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या काका राहत असलेल्या घरी जाऊन त्यांच्याशी ईटीव्हीच्या प्रतिनिधीने संपर्क केला.

हेही वाचा-माझ्यावर छुप्या हेतूने कायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री करा, समीर वानखेडेंची पोलिसांना विनंती

समीर ज्ञानदेव वानखेडे यांचे मुळ गाव हे वाशिम जिल्ह्यातील वरुड तोफा हे आहे. या गावात त्यांची वडिलोपार्जित घर जमीन आहे. त्यांचे काका शंकरराव कचरुजी वानखेडे हे सेवानिवृत्त आहेत. ते वाशिम शहरातील लाखाळा परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरी जाऊन समीर वानखेडे यांच्या वडील ज्ञानदेव यांचे मूळ कागदपत्रे पाहिली. त्यांचे जातीचे प्रमाणपत्र हे अनुसूचित जातीचे असल्याचे दिसून आले आहे.

समीर वानखेडे यांच्या मूळ गावी ईटीव्ही भारत,

हेही वाचा-नवाब मलिक म्हणाले 'फर्जिवाडा इथूनच सुरु होतो', समीर वानखेडेंची NDPS कोर्टात वादग्रस्त माहिती

समीर वानखेडे यांचे काका शंकरराव वानखेडे म्हणाले, माझा भाऊ ज्ञानदेव कचरूजी वानखेडे हे मुंबईला लोखंडवाला परिसरात राहत असल्याने त्यांना दाऊद हे टोपण नाव दिले असेल. मात्र. त्यांच्यावर राजकीय आरोप होत आहेत. माझ्या भावाचे नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. तर पुतण्याचे समीर ज्ञानदेव वानखेडे हेच नाव असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातमी वाचा-नवाब मलिकांच्या ट्विटला समीर वानखेडेंचे परिपत्रकाद्वारे प्रत्त्युत्तर, म्हणाले...

काय म्हणाले समीर वानखेडे -

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी माझ्याशी संबंधित काही कागदपत्रे ट्विट केले आहेत. माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे हिंदु असून ते निवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहेत. तसेच माझी आई जाहीदा ही मुस्लीम होती. मी एक धर्मनिरपेक्ष परिवारातील असून मला त्याचा गर्व आहे. माझा 2006 मध्ये डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी माझा विवाह झाला होता. नंतर 2016 मध्ये आमचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2017 मध्ये मी क्रांती रेडकर यांच्याशी विवाह केला, अशी माहिती समीर वानखेडे यांनी दिली आहे.

Last Updated :Oct 25, 2021, 3:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details