महाराष्ट्र

maharashtra

माझे 'ते' विधान माध्यमांनी चुकीचे दाखवले -शंभुराज देसाई

By

Published : Jul 19, 2021, 7:31 PM IST

पंकजा मुंडे यांच्याबद्दल मी केलेले वक्तव्य माध्यमांनी चुकीचे दाखवले. मला विचारलेल्या प्रश्नावर मी उत्तर दिले होते. ते दाखवले. मात्र, त्यातील पुर्ण भाग दाखवला नाही. त्यामुळे गैरसज झाला, असे स्पष्टीकरण गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहे. ते वाशिम येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांची पत्रकार परिषद
गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांची पत्रकार परिषद

वाशिम - पंकजा मुंडे यांच्याबद्दल मी केलेले वक्तव्य माध्यमांनी काटछाट करू चालवले. मात्र, मी मला विचारलेल्या प्रश्नावर ते बोललो होतो. 'भाजपवर पंकजा मुंडे नाराज आहेत, त्या शिवसेनेत येणार काय?' असा मला प्रश्न विचारला गेला. त्यावर मी 'त्या शिवसेनेत येणार असतील तर त्यांचे शिवसेनेत स्वागतच आहे. तसेच, त्यांचा योग्य सन्मान आमचा पक्ष करेल' अस उत्तर मी दिले होते. मात्र, त्याचा काहीच भाग दाखवल्याने त्याबद्दल गैरसमज झाला आहे, असे स्पष्टीकरण गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले आहे. ते वाशिम येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई वाशिम येथे पत्रकार परिषदेत बोलताना

'त्यावर मी बोलणे योग्य नाही'

पुणे आयुक्तांनी संजय राठोड यांना क्लीन चिट दिली का नाही, मला माहित नाही. तसेच, कोणाला मंत्रिमंडळामध्ये घेयचे हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतात. त्यामुळे त्यावर मी बोलणे योग्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली. वाशिम येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश'

कोरोनाच्या संकटामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना यंदाही बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणीचे संकट येत आहे. वाशिम जिल्ह्यात सोयाबीनचे बोगस बियाणांच्या अनेक तक्रारी येत असल्याचे खासदार भावना गवळी यांनी सांगितले. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे बियाणांची उगवण न झाल्याची तक्रार आली आहे. त्या तक्ररीची तत्काळ दाखल करून, संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details