महाराष्ट्र

maharashtra

आमदार राजेंद्र पाटणींच्या नेतृत्वात रॅली, नागरिकत्व कायद्याचे केले समर्थन

By

Published : Jan 1, 2020, 2:59 AM IST

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये विविध हिंदू संघटनानी सहभाग नोंदवला.

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली
नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

वाशिम- नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे आमदार राजेंद्र पाटणी यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात आली. यामध्ये विविध हिंदू संघटनानी सहभाग नोंदवला. राम मंदीरापासून रॅलीला सुरुवात झाली, यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

मोर्चातील नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. राष्ट्रगीत घेऊन रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी हजारो नागरिक रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details