महाराष्ट्र

maharashtra

वाशिम : जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

By

Published : Oct 2, 2021, 12:46 PM IST

heavy rains in washim district
washim ()

जिल्ह्यात रात्रीच्या पावसामुळे शेलुबाजार परिसरातील नदीला पूर आला होता. या पुरात नदीकाठी शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले होते. काही शेतकऱ्यांच्या शेतात चार फूट पाणी साचले आहेत.

वाशिम - जिल्ह्यातील मालेगाव मंगरूळपीर तालुक्यात शुक्रवारी रात्री 8 वाजता वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. याच वेळी मंगरूळपीर तालुक्यात गारपीट झाली. त्यामुळे पिकांना त्याचा फटका बसला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकर्‍यांनी शेतातील सोयाबीनची काढणी तसेच वाळण्यासाठी ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले आहे.

वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
जिल्ह्यात रात्रीच्या पावसामुळे शेलुबाजार परिसरातील नदीला पूर आला होता. या पुरात नदीकाठी शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतात चार फूट पाणी साचले आहेत. शेलू बाजार परिसरातील खाली पट्ट्यातील शेतकऱ्याचे सोयाबीन सर्व खराब झाले आहे. जास्त पाऊस झाल्याने यंदा फळे तसेच भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

शेताला आले नदीचे रुप

मंगरुळपिर तालुक्यातील खराबी पिंप्री येथिल कृष्णराव ठाकरे यांच्या शेतात पाणी गेले आहे. याचप्रमाणे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भरल्या शेतात पाणी गेल्याने शेतकऱ्यांना पाणीही दिसत नाही.
हेही वाचा -भाविकांची प्रतीक्षा संपली! 7 ऑक्टोबरपासून शेगावमधील गजानन महाराजांचे मंदिर दर्शनासाठी होणार खुले!

ABOUT THE AUTHOR

...view details