महाराष्ट्र

maharashtra

वाशिम : शेतकऱ्याने सोयाबीनपासून साकारली बाप्पाची मूर्ती

By

Published : Sep 15, 2021, 5:46 PM IST

संपादित छायाचित्र

सोयाबीनच्या बाजारभावाने गाठलेला विक्रमी पल्ला, हा पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सुखद धक्का आहे. सोयाबीनचे हेच बाजारभाव कायम राहावे. यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चक्क सोयाबीनपासून बाप्पा साकारत त्यांना साकडे घातले आहे.

वाशिम - सोयाबीनच्या बाजारभावाने गाठलेला विक्रमी पल्ला, हा पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सुखद धक्का आहे. सोयाबीनचे हेच बाजारभाव कायम राहावे. यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चक्क सोयाबीनपासून बाप्पा साकारत त्यांना साकडे घातले आहे.

शेतकऱ्याने सोयाबीनपासून साकारली बाप्पाची मूर्ती

कपाशीनंतर नगदीचे पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतात. कमी अधिक पावसाळा तसेच मध्यम प्रतिच्या जमिनीतही समाधानकारक उत्पन्न देणाऱ्या सोयाबीन पिकाने येथील शेतकऱ्यांची आर्थिक घडी सावरण्यात मोलाची मदत केली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी असणाऱ्या सोयाबीनचे मागील हंगामात अपेक्षित उत्पन्न हाती न आल्याने किंवा अचानक मागणी वाढल्याने सध्या सोयाबीनच्या बाजारभावाने विक्रमी वाटचाल करत 10 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.

सोयाबीनचे हे बाजारभाव कायम राहावे यासाठी वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील शेतकऱ्यांनी चक्क सोयाबीनपासून बाप्पाची आकर्षक मूर्ती साकारत बाप्पांना साकडे घातले आहे. कुठलेही कृत्रिम रंग किंवा साहित्याचा वापर न करता सोयाबीनपासून साकारण्यात आलेले बाप्पा भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

हेही वाचा -वाशिममध्ये गौराई म्हणून सुनांचीच पूजा; पाहा ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट

ABOUT THE AUTHOR

...view details