महाराष्ट्र

maharashtra

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुत्राचे 'शोले' स्टाईल आंदोलन

By

Published : Jan 30, 2021, 4:32 PM IST

Updated : Jan 30, 2021, 4:42 PM IST

केंद्र सरकारने मंजूर केलेली तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे, यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कारंजा तालुक्यातील वाई येथील गोपाल ठाकरे या शेतकरी पुत्राने बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

Farmers' 'Sholay' style agitation
Farmers' 'Sholay' style agitation

वाशिम -केंद्र सरकारने मंजूर केलेली तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे, यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी कारंजा तालुक्यातील वाई येथील गोपाल ठाकरे या शेतकरी पुत्राने बीएसएनएलच्या मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.

शेतकऱ्याचे शोले स्टाईल आंदोलन
सकाळी दहा वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. गोपाल ठाकरे आणि एका शेतकऱ्याने शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घेण्यात यावे व दिल्ली येथील सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन सुरू केले. हे आंदोलन अखेर चार वाजता नायब तहसीलदार आणि कारंजा ग्रामीणचे ठाणेदार यांनी मध्यस्थी करून आंदोलन सोडविण्यात आले.यावेळी वाई येथील नागरिकांनी हे आंदोलन बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती पोलीस आणि तहसील प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
Last Updated : Jan 30, 2021, 4:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details