महाराष्ट्र

maharashtra

Bhavana Gawli ED case : सईद खानसह सार्वजनिक बांधकाम विभागाची ईडीकडून 8 तास चौकशी

By

Published : Oct 12, 2021, 3:48 PM IST

Updated : Oct 12, 2021, 9:29 PM IST

सईद खान
सईद खान ()

सार्वजनिक बांधकाम विभागात व देगाव येथील संस्थामध्ये ईडीची चौकशी सुरू होती. दोन्ही ठिकाणी सात ते आठ अधिकारी या चौकशीत होते. आज दिवसभर देगाव येथील संस्थामध्ये तीन तास तर सार्वजनिक बांधकाम विभागात 8 तास दस्ताऐवज तपासणी करण्यात आली आहे.

वाशिम -खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय असलेले सईद खान यांच्या भूमी कन्ट्रॅशनच्या वतीने रस्त्याच्या कामात घोटाळा झाला असल्याने वाशिममध्ये आज (मंगळवारी) 1 वाजतापासून सार्वजनिक बांधकाम विभागात व देगाव येथील संस्थामध्ये ईडीची चौकशी सुरू होती. दोन्ही ठिकाणी सात ते आठ अधिकारी या चौकशीत होते. आज दिवसभर देगाव येथील संस्थामध्ये तीन तास तर सार्वजनिक बांधकाम विभागात 8 तास दस्ताऐवज तपासणी करण्यात आली आहे.

माहिती देतांना तक्रारदार हरीश सारडा

ईडीकडून बांधकाम विभागाची चौकशी सुरू

यवतमाळ-वाशिम च्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर ईडीची कारवाई झाल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय असलेले सईद खान यांना चौकशीच्या ताब्यात घेवून चौकशी केली. वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात गैरप्रकार झाल्याच्या हरीश सारडा यांच्या हायकोर्टातील याचिकेनंतर ईडी चे 4 अधिकारी वाशिम शहरात आले असून, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाची चौकशी सुरू आहे.

वाशिम शहरातील रस्त्याच्या कामासाठी एकूण 5 टेंडर आले. यातील 2 टेंडर बेकायदेशीररित्या अपात्र करण्यात आले. उर्वरित 3 टेंडर अजयदीप इन्फ्राकॉन प्रा लि औरंगाबाद या कंपनीचे होते. या कंपनीने 13% जास्त दराने हे काम घेतल्याचा आरोप करत यासंदर्भात वाशीम येथील हरीश सारडा यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. अजयदीप इन्फ्राकॉन यांनी सदर टेंडर खासदार भावना गवळी यांनी मॅनेज करून आपल्याला दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे काम अजयदीप इन्फ्राकाँन प्रा लि औरंगाबाद या कंपनीकडून सईदखान यांच्या भूमी कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, यावरून वाशीम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ईडीच्या पथकाकडून चौकशी सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी 2019 मध्ये चोरीला गेलेल्या सात कोटी रुपयांची चोरीची तक्रार 2020 मध्ये दिली. मात्र, सात कोटी रुपये आले कुठून? असा प्रश्न भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला होता. सोबतच खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्या संदर्भात केलेल्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही यावेळी सोमैया यांनी केला होता. खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर ईडीचे अधिकारी पोहचले असून, चौकशी करण्यात आली होती. भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष ट्रस्टचे परिवर्तन महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये केले. हे परिवर्तन करत असताना भावना गवळी यांनी खोटी कागदपत्र सादर केली. खोटी कागदपत्रे सादर करून ट्रस्टचे रूपांतर कंपनीमध्ये केले असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला होता. हा घोटाळा जवळपास शंभर कोटी असल्याचा अंदाजही किरीट सोमैया यांनी व्यक्त केला होता. याबाबत कारवाई करत ईडीकडून (28 सप्टेंबर रोजी) सईद खान या संचालकाला अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर भावना गवळी यांनाही अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

हेही वाचा -कोण आहेत दबंग अधिकारी समीर वानखेडे? जाणून घ्या ईटीव्ही भारत'चा खास रिपोर्ट

Last Updated :Oct 12, 2021, 9:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details