महाराष्ट्र

maharashtra

Shiv Seva MP Bhavana Gawali : तपासासाठी ED ची टीम वाशिममध्ये दाखल

By

Published : Sep 3, 2021, 4:35 PM IST

ed

शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शंभर कोटीच्या घोटाळा प्रकरणी संस्थेच्या चौकशीसाठी ईडीची टीम वाशिम येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल झाली आहे.

वाशिम -शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शंभर कोटीच्या घोटाळा प्रकरणी संस्थेच्या चौकशीसाठी ईडीची टीम वाशिम येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल झाली आहे. तीन तासापासून ईडीची टीम कार्यालयात चौकशी करत आहे. रिसोडनंतर दुसऱ्यांदा ईडीची टीम वाशिम जिल्ह्यात आली आहे.

हेही वाचा -ईडीच्या कारवाईवर खासदार भावना गवळी म्हणाल्या, हा तर जुलमीपणा...

चार दिवसांपूर्वी खासदार भावना गवळी यांच्यावर 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला होता. त्यानंतर ईडीने देगांव स्थित बालाजी पार्टीकल बोर्ड आणि रिसोड येथील दि रिसोड अर्बन क्रेडिट सोसायटीसह इतर दोन ठिकाणी चौकशी केली होती.

  • भाजप नेते किरीट सोमैया यांनी केले होते आरोप -

वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांनी 2019 मध्ये चोरीला गेलेल्या सात कोटी रुपयांची चोरीची तक्रार 2020 मध्ये दिली. मात्र, सात कोटी रुपये आले कुठून? असा प्रश्न भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी उपस्थित केला होता. सोबतच खासदार भावना गवळी यांनी बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्या संदर्भात केलेल्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोपही सोमैया यांनी केला होता. 30 ऑगस्ट रोजी खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर ईडीचे अधिकारी पोहचले होते.

हेही वाचा -शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या शिक्षण संस्थावर ईडीचा छापा; चौकशी सुरू...

ABOUT THE AUTHOR

...view details