महाराष्ट्र

maharashtra

ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपकडून वाशिममध्ये आंदोलन

By

Published : Jun 3, 2021, 4:37 PM IST

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आज वाशिममध्ये आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

BJP oppose OBC reservation cancel washim
ओबीसी आरक्षण रद्द निषेध भाजप वाशिम

वाशिम - स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने आज वाशिममध्ये आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

माहिती देताना भाजप युवा मोर्चाचे सुरज चौधरी

हेही वाचा -जागतिक सायकल दिन विशेष - सायकल चालवा, रोगप्रतिकार शक्ती वाढवा

आंदोलनात आमदार लखन मलिक, भाजप युवा मोर्चाचे उपप्रदेशाध्यक्ष राजू पाटील राजेंसह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पुण्यातही आंदोलन

आरक्षण आमच्या हक्काचं... उठ ओबीसी जागा हो एकजुटीचा धागा हो... ओबीसी के सन्मान मे भाजपा मैदान में... अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांकडून महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारने केलेल्या हलगर्जीपणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा -वाशिममध्ये कोरोना संसर्गात घट; खबरदारी घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details