महाराष्ट्र

maharashtra

वाशिम जिल्ह्यातील 1 हजार 800 पोलिसांना दिला माधव रसायन काढा

By

Published : Jun 8, 2020, 6:10 PM IST

जिल्ह्यातील 1 हजार 800 पोलीस बांधवांना माधव रसायन काढा देण्यात आला आहे. वाशिम आयुर्वेद परिवार आणि श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत हा काढा देण्यात आला.

1,800 policemen were given Madhav Rasayan Kadha in washim
वाशिम जिल्ह्यातील 1 हजार 800 पोलिसांना दिला माधव रसायन काढा

वाशिम - जिल्ह्यातील 1 हजार 800 पोलीस बांधवांना माधव रसायन काढा देण्यात आला आहे. वाशिम आयुर्वेद परिवार आणि श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत हा काढा देण्यात आला. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी माधव रसायन काढ्याचा चांगला उपयोग होतो.

वाशिम जिल्ह्यातील 1 हजार 800 पोलिसांना दिला माधव रसायन काढा

वाशीम जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 11 असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तिघांवर उपचार सुरू आहेत. सुदैवाने अद्याप वाशिम जिल्ह्यात एकाही पोलिसाला कोरोनाची लागण झाली नाही. संपूर्ण जगात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. आयुर्वेदिक चिकित्सेचा अंतर्भाव असणाऱ्या आयुष मंत्रालयाने कोविड १९साठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आयुर्वेदीक औषधे वापरण्याबाबतचे निर्देश व मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. याच अनुषंगाने काही नवीन वनस्पती, औषधे यांची जोड देऊन संशोधन करून आताच्या परिस्थितीमध्ये उपयोगी असा माधव रसायन काढा 1 हजार 800 पोलिसांना देण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details