महाराष्ट्र

maharashtra

वर्ध्यात म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन तयार करायला परवानगी, अवघ्या बाराशे रुपयांत मिळणार इंजेक्शन

By

Published : May 14, 2021, 9:36 PM IST

वर्ध्यात आता रेमडेसिवीर नंतर 'एम्फोटेरेसिन - बी' हे इंजेक्शजन निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या फूड आणि ड्रग विभागाने हे इंजेक्शन निर्माण करण्यासाठी एमआयडीसीमधील जेनेटिक लाइफ सायन्सला परवानगी दिली आहे. यामुळे अवघ्या 1200 रुपयांत हे इंजेक्शन मिळणार असून, रोज जवळपास 20 हजार व्हायल्स तयार होणार आहेत.

वर्ध्यात म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन तयार करायला परवानगी
वर्ध्यात म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन तयार करायला परवानगी

वर्धा -वर्ध्यात आता रेमडेसिवीर नंतर 'एम्फोटेरेसिन - बी' हे इंजेक्शजन निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या फूड आणि ड्रग विभागाने हे इंजेक्शन निर्माण करण्यासाठी एमआयडीसीमधील जेनेटिक लाइफ सायन्सला परवानगी दिली आहे. यामुळे अवघ्या 1200 रुपयांत हे इंजेक्शन मिळणार असून, रोज जवळपास 20 हजार व्हायल्स तयार होणार आहेत. यामुळे म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नाने रेमडेसिवीर इंजेक्शन निमार्ण करण्यासाठी वर्ध्याच्या जेनेटिक लाईफ सायन्स या कंपनीला परवानगी मिळला होती. यात रेमडेसिवीरच्या 17 हजार व्हाल्सची पहिली खेप मिळाली असतानाच आता दुसऱ्या दिवशी एम्फोटेरेसिन इंजेक्शन निर्माण करण्याची देखील परवानगी मिळाली आहे.

वर्ध्यात म्युकरमायकोसिसचे इंजेक्शन तयार करायला परवानगी

येत्या 15 दिवसांत इंजेक्शन तयार करायला सुरुवात

येत्या 15 दिवसात इंजेक्शन बनवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचेही सांगितले जात आहे. हे इंजेक्शन ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिसवर प्रभावी आहे. या इंजेक्शनचा राज्यात सध्या तुटवडा आहे, इंजेक्शनचा तुटवडा असमुळे हे इंजेक्शन काळ्या बाजारात 25 हजारापर्यंत विकले जात आहे. याच पार्श्वभूमीवर तुटवडा दूर करण्यासाठी आता वर्ध्यात या इंजेक्शनच्या निर्मितीला परवानगी देण्यात आली आहे. या इंजेक्शनची मागणी सध्या 400 टक्यानी वाढली असून, ब्लॅक फंगसच्या एका रुग्णाला 50 ते 120 व्हयल्स देण्याची गरज भासू शकते.

होही वाचा -हात-पाय बांधून तलवार दिली तर लढणार कसे?, आरक्षणाच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाणांचा केंद्राला सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details