महाराष्ट्र

maharashtra

नागपुरातील तडीपार वर्ध्यातील दुकानफोडीप्रकरणी अटकेत

By

Published : Jun 23, 2020, 3:09 PM IST

वर्ध्यातील मोणार्क स्टील या दुकानाचे कुलूप तोडून रोख रकमेसह अन्य साहित्य लंपास करण्यात आल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी नागपुरच्या इतवारा परिसरातील तडीपार असणारा अट्टल गुन्हेगार बजरंग उर्फ सत्यवान चावरे याने केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवत त्याने दुकान फोडल्याचे कबुल केले.

 नागपुरातील तडीपारास वर्ध्यातील घरफोडीत अटक
नागपुरातील तडीपारास वर्ध्यातील घरफोडीत अटक

वर्धा - येथील वर्धा शहर पोलीस ठाण्यांतर्गत मोणार्क स्टील दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्याने दुकानातील रोख आणि सहित्य लंपास केले. या प्रकरणी शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यात गुन्हे प्रगटीकरण पथकाने आरोपीचा शोध घेतला असता बजरंग उर्फ भजु सत्यवान चावरे यास अटक करण्यात आली. तो नागपुरातून तडीपार असून वर्ध्यात कालावधी पूर्ण करत आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मोणार्क स्टील या दुकानाचे कुलूप तोडून चोरी झाल्याची तक्रार पवन घनश्याम अग्रवाल यांनी शहर ठाण्यात केली. यावेळी प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. यात ही चोरी नागपुरच्या इतवारा परिसरातील तडीपार असणारा अट्टल गुन्हेगार बजरंग उर्फ सत्यवान चावरे याने केल्याची माहिती मिळाली. यावेळी त्याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवण्याचे काम शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रगटीकरण शाखेने केले. यावेळी त्याने दुकान फोडल्याची कबुली दिली. त्याच्याकडून रोख आणि 15 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांच्या नेतृत्वात बाबाराव बोरकुटे, राजू वैरागडे, महादेव सानप, जगदीश चव्हाण, गीतेश देवघर, विकास मुंडे, गंगाधर तांबारे आदींनी कारवाई केली. यात पुढील तपासात आणखी काही गुन्ह्याची उकल होईल का या अनुषंगाने चौकशी सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details