महाराष्ट्र

maharashtra

वर्ध्यात बैल पोळा उत्साहात साजरा, ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली सर्जाराजाची मिरवणूक

By

Published : Aug 31, 2019, 5:07 AM IST

शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा सण. वर्षभर शेतात धन्यासाठी राबणाऱ्या बैलांप्रती एकप्रकारे कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. वर्ध्यात भगतसिंग मैदानावर मागील 20 वर्षापासून साजरा होणारा बैल पोळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.

वर्ध्यात बैल पोळा उत्साहात साजरा, ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली सर्जाराजाची मिरवणूक

वर्धा- शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा सण. वर्षभर शेतात धन्यासाठी राबणाऱ्या बैलांप्रती एकप्रकारे कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. वर्ध्यात भगतसिंग मैदानावर मागील 20 वर्षापासून साजरा होणारा बैल पोळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला.

वर्ध्यात बैल पोळा उत्साहात साजरा, ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली सर्जाराजाची मिरवणूक

बैल ऊन असो की पाऊस, मालकासोबत शेतात राबतो. या जिवाभावाच्या सहकाऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणचे पोळा होय. पोळ्याच्या पूर्वसंध्येला कुणी शेतात नेऊन तर कुणी नदीमध्ये तर कुणी घरीच बैलांना आंघोळ घालतात. त्यांना वेगवेगळे रंग लावून रंगवले जाते. पोळ्याला आकर्षक साज चढवत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढत मैदानावर आणले जाते. यावेळी सर्जा राजाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बैल जोडीची पूजा करण्यात आली.

आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार या कार्यक्रमाला उपस्थित होते. भगतसिंग व्यायाम मंडळाचे पदाधिकारीही मंचावर उपस्थित होते. सुरुवातीचा काळ वगळता मध्यंतरी झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना थोडे हायसे वाटत होते. यंदाच्या वर्षात चांगले उत्पादन येवो, बळीराजा सुखी होवो, अशा शुभेच्छा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार आणि आमदार पंकज भोयर यांनी दिल्या आहेत.

Intro:वर्धा
वर्ध्यात बैल पोळा उत्साहात

ढोल ताशाच्या गजरात सर्जा-राजाची मिरवणूक

वर्धा - पोळा, शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा सण. वर्षभर शेतात धन्यासाठी राबणाऱ्या बैलांप्रती एकप्रकारे कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. वर्ध्यात भगतसिंग मैदानावर मागील 20 वर्षापासून साजरा केला जाणारा बैल पोळा यंदाही आयोजित करण्यात आला.

आज यंत्र असले तरीही शेतात काम करण्यासाठी बैलांच महत्व अबाधित आहे. शेतात शेतकऱ्यांचा हक्काचा सहकारी म्हणजे बैल म्हणायला हरकत नाही. ऊन, वारा, पाऊस, थंडीत मालकासोबत शेतात राबतो. या जिवाभावाच्या सहकाऱ्याचा सण म्हणजे पोळा होय. पोळ्याच्या पूर्वसंध्येला कुणी शेतात नेऊन, कुणी नदीमध्ये तर कुणी घरीच बैलांना आंघोळ घालतात. सकाळी बैलांना वेगवेगळे रंग लावून रंगविले गेले. पोळ्याला आकर्षक साज चढवत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढत मैदानात पोहोचले. यावेळी शेतकऱ्याच्या सर्जा राजाला पाहण्यासाठी मोठ्या संख्येत गर्दी होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते बैल जोडीची पूजा करण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार पंकज भोयर, जिल्हाधिकारी विवेक भिमनवार हेसुद्धा उपस्थित होते. भगतसिंग व्यायाम मंडळाचे पदाधिकारीही मंचावर उपस्थित होते.

सुरुवातीचा काळ वगळता मध्यंतरी झालेल्या समाधानकारक पावसानं शेतकऱ्यांना थोडं हायस वाटत होतं. यंदाच्या वर्षात चांगले उत्पादन येवो, बळीराजा सुखी होवो, अश्या शुभेच्छा जिल्हाधिकारी विवेक भिमनवार आणि आमदार पंकज भोयर यांनी दिल्यात.

यावेळी बैलजोडी आकर्षक आणि उठावदार दिसावे म्हणून रंगून, सजून धजून बैल पोळ्यात आणले होते. यावेळी प्रत्यके बैलजोडीला भेटवस्तू देण्यात आली. पोळा सुटल्यानंतर घरोघरी महिलांनी बैलांचे पूजन केले.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details