महाराष्ट्र

maharashtra

अन् नवऱ्याला बायको आणि मुलासमोर तीन वाघांनी नेले फरफटत..

By

Published : May 28, 2021, 7:52 AM IST

Updated : May 28, 2021, 2:00 PM IST

तेंडुपत्ता तोडण्याचे काम सुरू असताना मुकुंद यांच्यावर अचानक तीन वाघांनी हल्ला केला. त्यात एक वाघीण आणि दोन वाघ असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघाने मुकुंद यांना काही अंतरावर फरफटत नेले.

वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू
वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

वर्धा - कारंजा तालुक्यातील राहटी जंगल परिसरात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुराचा तीन वाघांच्या हल्लात मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने सगळीकडे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुकुंद ढोके असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मुकुंद यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुलगाही होता. या दोघांसमोर वाघांनी मुकुंद यांना फरफटत नेल्याचे सांगण्यात येत आहे.


तीन वाघांचा हल्ला..
कारंजा तालुक्यातील नांदोरा येथील मुकुंद आपली पत्नी, मुलगा आणि नातलगासोबत जंगलात तेंदुपत्ता आणण्यासाठी गेले होते. यावेळी तेंडुपत्ता तोडण्याचे काम सुरू असताना मुकुंद यांच्यावर अचानक तीन वाघांनी हल्ला केला. त्यात एक वाघीण आणि दोन वाघ असल्याचे सांगण्यात येत जात आहे. हल्ल्यानंतर वाघांनी मुकुंद यांना काही अंतरावर फरफटत नेले. यावेळी मुकुंद ढोके यांनी सोबत असलेल्यांच्या आवाज देण्याच्या प्रयत्न करण्यात आला. पण कोणाचा लक्षात आले नाही. पण काही वेळाने त्या ठिकाणी तीन पट्टेदार वाघ दिसून आल्याचे मृतकाचे नातेवाईक रत्ना ढोक यांनी सांगितले.

अन् नवऱ्याला बायको आणि मुलासमोर तीन वाघांनी नेले फरफट
वनविभागाला माहितीहल्ल्यानंतर मुकुंद यांच्या पत्नीने याबाबतची माहिती गावकरी आणि वनविभागाला दिली. माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वाघांना जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यात आले. मात्र, तोपर्यंत मुकुंद यांचा मृत्यू झाला होता. मुकुंद यांचा मृतहेद शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून मुकुंद यांच्या कुटुंबीयांना तातडीची एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. तर उर्वरित १४ लाख रुपये शवविच्छेदनानंतर देण्यात येणार असल्याचे वन्रक्षेत्रपाल अधिकारी आर.बी.गायनेर यांनी सांगितले.
Last Updated : May 28, 2021, 2:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details