महाराष्ट्र

maharashtra

जिल्ह्यात कडक निर्बंधांमध्ये 1 जूनपर्यंत वाढ, ग्रामीण भागात काही प्रमाणात शिथिलता

By

Published : May 18, 2021, 6:59 PM IST

जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध घातले आहेत. यामध्ये 18 मे पासून ग्रामीण भागात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र शहरी भागात 1 जूनपर्यंत हे निर्बंध कायम असणार आहेत. या निर्बंधांनुसार शहरी भाग आणि शहराला लागून असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात केवळ अत्यावश्यक दुकांना सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत घरपोहोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे.

जिल्ह्यात कडक निर्बंधांमध्ये 1 जूनपर्यंत वाढ
जिल्ह्यात कडक निर्बंधांमध्ये 1 जूनपर्यंत वाढ

वर्धा - जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध घातले आहेत. यामध्ये 18 मे पासून ग्रामीण भागात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र शहरी भागात 1 जूनपर्यंत हे निर्बंध कायम असणार आहेत. या निर्बंधांनुसार शहरी भाग आणि शहराला लागून असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात केवळ अत्यावश्यक दुकांना सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत घरपोहोच सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे. वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान सोमवार, बुधवार, शुक्रवार असे एकदिवसाआड सर्व किराणा दुकाने, डेअरी, मिठाई, अंडे, मटन, पिठाची गिरणी तसेच खाद्य पदार्थांची सर्व दुकाने यांना सकाळी 7 ते 11 यावेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मंगळवार, गुरूवार व शनिवार
या दिवशी सर्व भाजीपाला व फळ विक्रेत्यांची दुकाने घरपोहोच सेवेसाठी सुरू राहाणार आहेत. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील दुकांना सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

कृषीशी संबंधीत दुकाने 7 ते 11 पर्यंत राहाणार सुरू

कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी सबंधीत दुकाने, सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत घरपोच सेवा देण्याकरता सुरू राहील. मात्र शेतक-यांना आवश्यक त्या वस्तुंचा पुरवठा घरापर्यंत तसेच बांधापर्यंत करण्याची जबाबदारी ही ग्रामपंचायत स्तरावर संबधीत कृषी सेवक, तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी यांच्यावर असणार आहे.

केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच पेट्रोलचा पुरवठा

नागरी भागातील पेट्रोलपंप सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू राहतील. परंतु रुग्णवाहिका, शासकिय वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांच्याच वाहनांना पेट्रोल, डिझेल उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व शासकिय, निमशासकिय, खासगी कार्यालये हे वेळेनूसार 15 टक्के क्षमतेने सुरू राहाणार आहेत.

हेही वाचा -गोव्यात म्युकरमायकोसिसने एकाचा मृत्यू; आणखी 6 जणांना लागण

ABOUT THE AUTHOR

...view details