महाराष्ट्र

maharashtra

नात्याला काळिमा फासाणारी घटना; सख्ख्या भावानेच केले बहिणीचे लैंगिक शोषण

By

Published : Jul 26, 2022, 11:02 AM IST

Brother Sexually Abused His Siste

बहिण-भावाचं नातं हे पवित्र बंधन असतं. रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचं बंधन असतं. माझा भाऊ नेहमीच माझं रक्षण करील, असा विश्वास प्रत्येक (Brother-Sister Relationship) बहिणीचा भावावर असतो. पण वर्ध्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधम सख्ख्या भावाने बहिणीचं लैंगिक शोषण (Sexual Assault) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहर पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले( city police Wardha ) आहे. तरया घटनेने समाजमन हादरून गेले आहे.

वर्धा - वर्धा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यात विकृत मनोवृत्तीच्या सख्ख्या भावाने नात्याला काळिमा फसत लहान बहिणीवर अत्याचार ( Sexual Assault ) करत गर्भवती केल्याचे समोर आले आहे. 15 वर्षीय मुलीच्या पोटात दुखत असल्यानें तपासणी केली असतांना गर्भवती असल्याचे समोर आले. तेच सखी वन स्टॉप सेंटरच्या महिला ( Sakhi One Stop Center ) अधिकाऱ्यांनी आपुलकीने चौकशी केली असताना 11 मध्ये शिकणाऱ्या सख्ख्या भावानेच हे दुष्कर्म केल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.



सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातुन पिडीतेचे केले समुपदेशन - वर्ध्याच्या सर्वसामान्य कुटुंबातील आई वडील मंजुरीसाठी बाहेर जात असतांना 17 वर्षीय मुलाने स्वतःच्याच अल्पवयीन 15 वर्षीय बहिणीवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या विकृत मानसिकतेच्या भावाने भीती दिल्याने मुलीने याची वाच्यया केली नाही. परिणामी दुर्लक्ष केल्याने आता तिच्या पोटात दुखत असल्याने ती गर्भवती असल्याचे वैदकीय तपासणीत सेवाग्राम रुग्णलयात ( Sevagram Hospital Wardha ) समोर आले. यात पीडिता सुरूवातीला काहिही सांगण्यास तयार नव्ह्ती. पण सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातुन तिला विश्वासात घेऊन तिला विचारपूस केली असता त्यात तिने सख्ख्या मोठ्या भावाने जोरजबरदस्ती केल्याचे समोर आले आहे. शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नोंद केली. यात आई वडील घरी राहत नसतांना मुलाने विकृत कृत्य केल्याचे समोर आले. यासाठी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. नात्याला काळिमा फासणाऱ्या या विकृत मानसिकतेचा मागचे कारण शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. या घटनेने समाजन मन हादरून गेले आहे.

हेही वाचा :Rape Cases in Mumbai Increased : मुंबईत महिला असुरक्षित, सहा महिन्यांत 494 बलात्कार; पोलिसांच्या आकडेवारीत धक्कादायक माहिती समोर

ABOUT THE AUTHOR

...view details