महाराष्ट्र

maharashtra

मुंबईत चाचण्या वाढवले पाहिजे - देवेंद्र फडणवीस

By

Published : Apr 28, 2021, 3:52 PM IST

Updated : Apr 28, 2021, 5:18 PM IST

राज्यात दररोज 65 हजार रुग्ण पाहायला मिळत आहेत. नागपूर, मुंबई, पुण्यात प्रसार दर 15 टक्क्यांवर आहे. मुंबईत चाचण्या कमी होत आहेत. दररोज होणाऱ्या कोरोना प्रमाण वाढवले पाहिजे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

वर्धा- राज्यात दररोज 65 हजार रुग्ण पाहायला मिळत आहेत. नागपूर, मुंबई, पुण्यात प्रसार दर 15 टक्क्यांवर आहे. मुंबईत चाचण्या कमी होत आहेत. दररोज होणाऱ्या कोरोना प्रमाण वाढवले पाहिजे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते वर्ध्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात बैठक घेऊन आढावा घेतला.

बोलताना देवेंद्र फडणवीस

यावेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार दादाराव केचे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत आयसोलेशन कक्षाला भेट दिली. टाळेबंदीबाबत सरकार काय निर्णय घेते यावर भाजप भूमिका स्पष्ट करेल. आम्ही जनतेसोबत आहोत, असेही फडणवीस म्हणालेत. अधिकाऱ्यांशी चर्चा करत अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

वर्ध्यात रुग्ण मृत्यूमुखी पडत आहे. त्या आकड्याचे रिकन्सलेशन झालेले नाही. त्यामुळे नेमका अंदाज येत नाही. पॉझिटिव्ह साइन असल्यास त्याच स्वागत करू. रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन बेडची गरज आहे. यासोबतच ऑक्सिजन प्लान्टचा प्रस्ताव देऊन मागणी नोंदवली आहे. ऑक्सिजन प्लान्टची गरज असल्याने त्या दृष्टीने गतीने काम करण्याची आवशक्यता आहे. मनयुष्यबळ वाढवण्याची गरज आहे. या सगळ्यात जास्तीत जास्त लोकांना सरकारी यंत्रणेकडून सेवा देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

शहरात दोन वैद्यकीय महाविद्यालय असल्याने व्यवस्था आहे. पण, ग्रामीण भाग जो शहरापासून दूरवर आहे तिथे प्राथमिक व्यवस्था केली पाहिजे तशी गरज असल्याचे आमदारांनी व्यक्त केली आहे. यामुळे ग्रामीण भागात ही व्यवस्था उभी राहिल्यास ताण वाढत आहे. हा ताण कमी होण्यास मदत होईल यासाठी प्रशासनाने पाऊल उचलले पाहिजे.

हेही वाचा -'एक वर्षाचा आमदार निधी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी खर्च करा'

Last Updated : Apr 28, 2021, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details