महाराष्ट्र

maharashtra

Accident on Samriddhi Highway: समृद्धी महामार्गावर अपघात, महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

By

Published : Apr 29, 2023, 3:24 PM IST

Updated : Apr 29, 2023, 5:22 PM IST

समृद्धी महामार्गावर हरियाणा पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला असून यामध्ये महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे. आज शनिवार (29 एप्रिल)रोजी वर्धा येथील येळाकेळी टोलजवळ ही घटना घडली आहे.

Etv Bharat
Etv Bharat

वर्धा :सध्या समृद्धी महामार्ग हा जीवघेना मार्ग ठरलेला असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने या महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. आज शनिवार वर्धा जिल्ह्यात एक अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. परभणी येथून आरोपीला हरियाणाला घेऊन जात असताना वर्ध्याच्या येळाकेळी येथील पांढरकवडा शिवारात हरियाणा पोलिसांचे वाहन समोर असलेल्या ट्रकला उजव्या बाजूने धडकले. यामध्ये वाहनातील महिला पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण ह्यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर चारजण जखमी झाले आहेत. या गाडीत एकून पाच लोक चालले होते. वाहन चालक शमी कुमार, सविदर सिंग, वैदनाथ शिंदे, बिटू जागडा हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी उपचारासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात : आरोपीला हरियाणा येथे घेऊन जाणाऱ्या हरियाणा पोलोसांचे वाहन वर्ध्या नजीक समृद्धी महामार्गावर ट्रकला धडकले. वर्धा येथील येळाकेळी टोल प्लाझा नजीक घडलेल्या या घटनेत हरियाणाच्या पंचकुला पोलीस ठाण्यातील महिला पोलीस निरिक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर चालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहे. परभणी येथून आरोपीला घेऊन हरियाणा पोलीस समृद्धी महामार्गाने जात होते. दरम्यान वर्ध्याच्या येळाकेळी येथील पांढरकवडा शिवारात हरियाणा पोलिसांचे वाहन समोर असलेल्या ट्रकला उजव्या बाजूने धडकले. या पोलीस वाहनात 5 व्यक्ती होते. महिला पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण ह्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या गंभीर अपघातात वाहन चालक शमी कुमार, सविदर सिंग, वैदनाथ शिंदे, बिटू जागडा हे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे

सध्या मोठ्या प्रमाणामध्ये या अपघात : वर्धा जिल्ह्यात घडलेल्या अपघाताने परिसरातील नागरिकांमध्ये हळूहळू व्यक्त होत आहे. एका महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याने पोलिसांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. सातत्याने या रस्त्यावर होणाऱ्या अपघाताची काहीतरी उपाययोजना करावी अशीसुद्धा मागणी आता सातत्याने होत आहे. कारण, वारंवार होणारे अपघात हे जीवघेणे ठरत आहेत. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये या अपघातात वाचणाऱ्यांना अपंग सुद्धा आलेले आहे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यामुळे एकंदरीत या समृद्धी महामार्गावरील अपघात कसे थांबवावे हा आता संशोधनाचा विषय बनलेला आहे.

हेही वाचा :भिवंडीत ३ मजली इमारत कोसळली, 20 ते 25 नागरिक अडकल्याची भीती, बचावकार्य सुरू

Last Updated : Apr 29, 2023, 5:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details