महाराष्ट्र

maharashtra

आर्वी तहसीलच्या रेकॉर्ड रुमला भीषण आग; आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू

By

Published : May 13, 2021, 7:47 AM IST

Updated : May 13, 2021, 9:06 AM IST

शहराच्या मध्यभागात पोलीस ठाण्याच्या परिसराला लागून तहसील कार्यालय आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास पोलीस कर्मचारी राहुल देशमुख यांना तहसील कार्यालय परिसरात आग आणि धूर दिसला. त्यांनी याची तत्काळ माहिती पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना दिली. ही माहिती तहसीलदार आणि एसडीओ यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले.

wardha todays top news
आर्वी तहसीलच्या रेकॉर्ड रूमला आग

वर्धा -तहसील कार्यालय परिसरातील रेकॉर्ड रुमला गुरुवारी पहाटे साडे तीन वाजताच्या सुमारास आग लागली. लागूनच असलेल्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी धूर निघत असल्याचे दिसताच त्यांनी तत्काळ अग्निशामक यंत्रणेला घटनास्थळी पाचारण केले. अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र या आगीत मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचे रेकॉर्ड जळून खाक झाले आहे.

आर्वी तहसीलच्या रेकॉर्ड रूमला आग

मध्यरात्री आग लागल्याने मोठी तारांबळ-

शहराच्या मध्यभागात पोलीस ठाण्याच्या परिसराला लागून तहसील कार्यालय आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास पोलीस कर्मचारी राहुल देशमुख यांना तहसील कार्यालय परिसरात आग आणि धूर दिसला. त्यांनी याची तत्काळ माहिती पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना दिली. ही माहिती तहसीलदार आणि एसडीओ यांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. अग्निशामक दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले होते. आग लागलेल्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या नोंदी, दस्तावेज, जागेच्या खरेदी विक्री, असे अनेक प्रकारचे कागदपत्रे, महसुली जुने रेकॉर्ड आहेत. मध्यरात्री अचानक आग आल्याने मोठी तारांबळ उडाली होती. ही आग लागण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

आगीत कागदपत्रासह साहित्य जळून खाक -

आग विझवण्यासाठी 2 तासापासून प्रयत्न सुरू होते. आगीची भीषणता पाहून आर्वी, पुलगाव, आष्टी येथील अग्निशामक बंब घटनास्थळी पाचारण करण्यात आले. तसेच जेसीबीच्या साह्याने इमारतीच्या मागील बाजूचा भाग तोडून आग विझवण्याचे काम सुरू करण्यात आले. या आगीमध्ये कार्यालयातील संगणक, कागदपत्रे, इतर साहित्य जळून खाक झाले आहे.

आगीवर अद्याप नियंत्रण नाही -

उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, संजय गायकवाड यांच्यासह नगराध्यक्ष प्रशांत सवलाखे हे सुद्धा आले आहेत. आगीवर अद्याप नियंत्रण मिळाले नसून आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

हेही वाचा - नागपूरमध्ये 2 ते 18 वर्षाच्या बालकांवर होणार कोरोनावरील लसीची चाचणी

Last Updated : May 13, 2021, 9:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details