महाराष्ट्र

maharashtra

"लसीकरण करा, तब्बल पाच लाख मिळवा," वर्धा जिल्ह्यात अभिनव योजना

By

Published : Apr 8, 2021, 12:43 PM IST

Updated : Apr 8, 2021, 2:39 PM IST

वर्धा जिल्ह्यात आठ तालुके आहे. यातील प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायत तसेच सर्व नगरपरिषदेमधील दोन वार्ड असे मिळून १६ वार्ड यांना यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. पालकमंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

5 lakh rupees prize for corona vaccination in wardha
लसीकरण करा आणि मिळवा पाच लाखांचे पारितोषिक, वर्धा जिल्ह्यात

वर्धा - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अधिकाधिक लसीकरण करण्याच्या पर्याय पुढे येत आहे. यासाठीच लसीकरण मोहीम युद्धपातळीवर राबवली जात आहे. पण अजूनही लसीकरणाच्या बाबतीत गैरसमज आहेतच. यामुळे लसीकरण वाढविण्यासाठी नवनवीन संकल्पना पुढे येत आहेत. यात राज्याचे पशुसंवर्धन तथा पालकमंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून वर्धा जिल्ह्यात बक्षीस योजना पुढे आली आहे.

या योजनेत वर्धा जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगर परिषदांच्या वॉर्डांसाठी प्रोत्साहन अनुदान म्हणून पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. जिल्ह्याच्या आठ तालुक्यात बक्षीस देण्यासाठी डीपीसी फंडातून हा निधी दिला जाणार आहे. जिल्ह्यात सध्या 45 वर्षांवरील व्यक्ती तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. पण नागरिकांमध्ये अजूनही गैरसमज आणि भीतीचे वातावरणात दूर झालेले नाही. यामुळे कोरोनातून वाचायचे असल्यास जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण व्हावे, अशी संकल्पना आहे. यासाठी लसीकरणाचे केंद्रही वाढवले जात आहेत.

लसीकरण करा आणि मिळवा पाच लाखांचे पारितोषिक....
काय करावे लागणार आहे पाच लाखाचा बक्षीस निधीसाठी
या योजनेतून बक्षीस मिळवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण करावे लागणार आहे. वर्धा जिल्ह्यात आठ तालुके आहेत. यातील प्रत्येक तालुक्यातून तीन ग्रामपंचायत तसेच सर्व नगरपरिषदेमधील दोन वार्ड असे मिळून १६ वार्ड यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. पालकमंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.
उपक्रम राबवणार वर्धा जिल्हा पहिला
प्रथम लसीकरण पूर्ण करणे हे काम सोपे नसणार आहे. पण नवनवीन संकल्पनेतून गावात लसीकरण होईल. दुसरीकडे स्पर्धेमुळे गावाला विकासासाठी निधी मिळवण्यासाठी संधी उपलब्ध होणार आहे. या पारितोषिक योजनेतूही लोकोपयोगी काम करता येणार आहेत. यामुळे गावाला आणि गावकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
लसीपासून कुठलीच भीती नाही

जिल्हाधिकारी कोरोनावरील लस पूर्णत: सुरक्षित आहे. प्रत्येकाने लसीकरण करून घ्यावे. गैरसमज किंवा भीती बाळगण्याची गरज नाही, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.

जिल्ह्यात लसीकरणाची स्थिती
जिल्ह्यात 45 वर्ष वरील आणि वयोवृद्धांना या लसीकरण मोहिमेत प्राध्यान्य देऊन लसीकरण केले जात आहे. यात जिल्ह्यात साधारण 59 केंद्रावर शहर आणि ग्रामीण भागात लस दिली जात आहे. यामध्ये उपजिल्हा ग्रामीण, तसेच पीएचसी केंद्रावर सोय उपलब्ध आहे. यात आतापर्यंत जवळपास 90 हजार 144 लोकांना लस देण्यात आली आहे. या मोहिमेतून नक्कीच या योजनेचा लाभ नागरिक आणि कोरोनाच्या लढ्यात सर्वांना होणार आहे.

Last Updated :Apr 8, 2021, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details