महाराष्ट्र

maharashtra

Thane Crime News : धक्कादायक! आपल्या मुलाशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेचा बापाने कट रचून केला खून

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2023, 8:24 PM IST

Thane Crime News : अनैतिक संबंधातून (Immoral Relationship) अनेकदा एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत मजल जाते. ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं अशाच एका खुनाचा उलगडा केला आहे. मुलाशी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या २२ वर्षीय महिलेचा, बापाने कट रचून खून केला आहे. ही धक्कादायक घटना अंबरनाथ तालुक्यातील हाजीमलंग गड परिसरात (Crime News) घडली आहे.

Thane Crime News
महिलेचा बापाने कट रचुन केला खून

महिलेचा बापाने कट रचुन केला खून

ठाणे Thane Crime News : आपल्या मुलाचे एका २२ वर्षीय महिलेशी असलेल्या अनैतिक संबधास (Immoral Relationship) विरोध असल्याच्या वादातून, बापाने मुलासह एका साथीदाराशी संगनमत करून खुनाचा कट रचल्याची घटना समोर (Crime News) आली आहे. ही घटना हाजीमलंग गडाच्या फेनिक्युलर रोपवेच्या जवळील झाडाझुडुपांमध्ये घडली होती. या खुनाचा ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन तपास केला. तसंच तांत्रिक विश्लेषणच्या आधारे, एका आरोपीच्या बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील आरवली गावात सापळा रचून बेड्या ठोकल्या आहे. नागा हरिनारायण यादव (वय २८) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. तर अमर लोटन सिंग आणि लोटन सिंग असे फरार असलेल्या बापलेकांची नावे आहेत.

तिघांनी रचला खुनाचा कट : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक महिलेशी फरार आरोपी अमरचे अनैतिक संबध होते. मात्र मृतक ही खालच्या जातीची असल्यानं त्यांच्या या संबंधास अमरचा बाप मुख्य आरोपी लोटन सिंगचा विरोध होता. त्यातच आरोपी अमर आणि मृतक महिलेसोबत काही कारणावरून वाद होत होते. त्यामुळे आरोपी अमरही या महिलेचा पिच्छा सोडविण्यासाठी त्याने आरोपी बापाला साथ दिली. ठरलेल्या प्रमाणे अटक आरोपी नागा याला सोबतीला घेऊन या तिघांनी खुनाचा कट रचला होता. त्यानंतर २५ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास मृत महिलेला आरोपी अमरने भेटण्याच्या बहाण्याने कल्याण पूर्वेतील पिसवली गावात बोलवून घेतलं होतं. तर अटक आरोपी नागा आणि मुख्य आरोपी बाप हे दोघेही आधीच ठरल्याप्रमाणे घटनस्थळी दबा ठेवून बसले होते.


तिन्ही आरोपींनी मिळून केला खून: संध्याकाळ नंतर अंधार पडताच मृतक महिलेला घेऊन आरोपी अमर हा फनिक्युलर रोपवेच्या लगत असलेल्या झाडाझुडपात गेला. त्यानंतर तिन्ही आरोपींनी मिळून तिचा खून केला. त्यानंतर घटनास्थळावरुन तिघेही फरार झाले. दरम्यान खून झाल्यानंतर दोन दिवसांनी एका अज्ञात महिलेचा मृतदेह झाडाझुडपात आढळून आल्याची माहिती, हिललाईन पोलीस पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. त्यानंतर २७ ऑक्टोंबर रोजी अनोळखी महिलेचा खून अज्ञात आरोपीने केल्याची नोंद पोलिसांनी केली.

cctv फुटेजचा केला तपास : खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी ठाणे गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असता घटनास्थळावरील cctv फुटेजचा तपास करून मृत महिलेची ओळख पटविण्यात आली. तसंच घटनास्थळावर तीन संशयीत आरोपींची संशयीतरित्या हालचाल करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्यानं, त्यांची तांत्रिक व गुप्तरित्या माहिती काढली आली. आरोपींनी मोबाईल बंद करून बिहार राज्यातील बक्सर जिल्ह्यात पळून गेल्याचे तपासात समोर आलं आहे.

आरोपी बाप लेक फरार: बिहार राज्यातील जिल्हा बक्सर येथील पोलीस पथक दाखल होऊन बक्सर जिल्ह्यातील आरवली गावात सापळा रचून नागा हरीनारायण यादव यास ताब्यात घेतलं. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं अधिक चौकशी केली असता, महिलेचा कट रचून खून केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी नागा यादवला अटक करून ठाणे गुन्हे शाखेच्या पथकानं हिललाईन पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती आनंद रावराणे यांनी दिली. तसंच अटक आरोपीला हिललाईन पोलिसांनी न्यायालयात हजर केलं असता, पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या गुन्ह्यातील बापलेक असलेले दोन्ही आरोपी अद्याप फरार असून पोलीस पथक त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा -

  1. जळगावात बापाने केला पोटच्या मुलाचा खून; संशयित आरोपीला अटक
  2. ... म्हणून बापाने केला तीन दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा दगडाने खून
  3. Sangli Murder News : दारुच्या नशेत पत्नीसोबत भांडण; अडीच वर्षाच्या मुलाचा बापाने केला खून

ABOUT THE AUTHOR

...view details