महाराष्ट्र

maharashtra

Thane Corona News : ठाणेकरांनो सावधान! कोरोनाचे एकाच आठवड्यात आढळले ५१ नवे रुग्ण

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 3:39 PM IST

Thane Corona News : ठाणे महापालिका हद्दीत गेल्या आठ दिवसांत कोरोनाचे नवीन 51 रुग्ण आढळले आहेत. यामुळे महापालिका प्रशासन सतर्क झालं असून आता कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात येत असल्याचं महापालिका प्रशासने सांगितलयं. नवीन ५१ रुग्णांपैकी केवळ ४ रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल असल्यानं घाबरण्याची आवश्यकता नसल्याचं महापालिका प्रशासनाने सांगितलय.

कोरोनाचे एकाच आठवडयात आढळले ५१ नवे रुग्ण
Thane Corona News

ठाणे Thane Corona News :मागील आठ दिवसात ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाच्या नवीन ५१ रुग्णांची नोंद झालीय. मात्र यातील केवळ ४ रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात दाखल असून इतर रुग्णांवर घरी उपचार सुरू आहेत. यामुळे वेळीच खबरदारी घेण्याची गरज असली तरी वाढलेल्या आकडेवारीमुळे घाबरण्याची आवश्यकता नसल्याचं महापालिका प्रशासनाने सांगितलय. (Thane Municipal Corporation)


कोरोनासह साथीच्या आजारांत वाढ : सध्या राज्यात पावसासह सणासुदीला सुरुवात झालीय. ठाणे शहरात गेल्या दोन दिवसांपासून तुफान पावसाने हजेरी लावल्याने साथीच्या रोगासह कोरोनानं डोकं वर काढलयं. मागील काही महिन्यात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो आदींसह इतर साथ आजारांच्या रुग्णात वाढ होत असल्याचं चित्र होतं. त्या पाठोपाठ आता कोरोनाचे नवीन ५१ रुग्ण (Thane Corona Update News) आढळले आहेत. गेली दोन वर्षे कोरोनाने ठाण्यात थैमान घातलं होतं. परंतु, आता कोरोनाचे रुग्ण आढळत असले तरी त्याची दाहकता कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. नव्याने कोरोनाचे रुग्ण वाढल्यानं प्रशासन सतर्क झालं असून काळजी करण्याचे कारण नसल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलंय. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने चाचण्यांची संख्या ही ३५० वरुन ७०० केली जाणार असल्याचं सांगण्यात आलय. आरोग्य केंद्रात त्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलीय. त्यातच येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव, नवरात्र उत्सव येत असल्यानं या कालावधीत अधिक सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

चाचण्यांची संख्या वाढवली आहे :जे नव्याने रुग्ण आढळले आहेत, त्यातील ४ रुग्ण हे रुग्णालयात दाखल होते, तर उर्वरीत रुग्णांवर घरीच उपचार झालेले आहेत. ही रुग्ण संख्या वाढत असली तरी देखील घाबरण्याचे कारण नाही. परंतु खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना चाचणीची संख्या वाढविण्यात येत आहे. - संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त, ठाणे मनपा

दररोज 350 चाचण्या : ठाण्यात मागील तीन महिन्यात साधारपणे ४० ते ४५ रुग्ण आढळून आले होते. तर दर दिवशी ३५० च्या आसपास कोरोनाच्या चाचण्या केल्या जात होत्या. मात्र आता एका आठवड्यात रुग्णांची संख्या अचानक वाढल्याने सहापालिका सर्तक झालीयं. तसंच कोरोनाचा हा नवा व्हॅरीएन्ट (Corona New Variant) असल्याचा अंदाजही पालिकेनं वर्तविलायं.

हेही वाचा :

  1. Kapil Patil Vs Kisan Kathore : कपिल पाटील-किसन कथोरे यांच्यात कुरघोडीचं राजकारण; भाजपाची वाढली डोकेदुखी
  2. Thane Crime : शिवसेना नेत्याच्या भावाचा अन् त्याच्या पत्नीचा आढळला मृतदेह; गोळीबार झाल्याचा पोलिसांना संशय
  3. Kirit Somaiya On Covid Scam : कथित व्हिडिओ क्लिपनंतर किरीट सोमय्या पुन्हा मैदानात; उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details