महाराष्ट्र

maharashtra

Husband Killed Wife : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच केली तिची हत्या

By

Published : Jun 14, 2023, 11:10 PM IST

27 मे रोजी ठाण्यातील मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह एका चादरीत बांधलेला आणि सेलो टेपने गुंडाळलेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास करून महिलेच्या पतीला पश्चिम बंगालमधून अटक केली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

Husband Killed Wife
Husband Killed Wife

गणेश गावडे पोलीस उपायुक्त, परिमंडळ १ माहिती देतांना

ठाणे :ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर येथे प्लास्टिक गोणीत सापडलेल्या महिलेच्या खुनाचा अखेर उलगडा झाला असून तिच्याच पतीने चारित्र्याच्या संशयावरून तिची हत्या केल्याचे पोलीस यापासात निष्पन्न झाले आहे. मुंब्रा पोलिसांनी मृत महिलेच्या पती आणि त्याच्या साथीदाराला अटक केली असून त्यांना पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

दोन जण ताब्यात : मुंब्रा रेतीबंदर येथे खाडीलगत दिनांक २७ मे २०२३ रोजी एका प्लॅस्टिकच्या गोणीत सेलोटेप च्या सहाय्याने बेडशीटमध्ये गुंडाळालेले अत्यंत सडलेल्या अवस्थेत महिलेचे शव मिळाल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या आधारे तपास करत अत्यंत क्लिष्ट अशा या खुनाचा उलगडा केला आहे. मुंब्रा पोलिसांनी आसपासच्या सर्व पोलीस स्थानकात बेपत्ता महिलांबद्दलची माहिती घेत या प्रकरणाचा छडा लावला. CCTV च्या आधारे तिथून जाणाऱ्या शेकडो गाड्यांपैकी एक टेम्पो पोलिसांच्या नजरेस पडला. तोच धागा पकडून पोलिसांनी आरोपी सलमान आणि त्याचा साथीदार नवाब याला पश्चिम बंगाल येथील मुर्शीदाबाद येथून ताब्यात घेतले.

१७ जुन पर्यंत पोलीस कोठडी :आरोपींच्या तपासात मृत महिलेचा पती सलमान हा आपली पत्नी हुमेजान उर्फ मुन्नी हिच्या चरित्र्यावर सतत संशय घेत होता. ज्यातून दोघांमध्ये सतत वाद होत होते. अखेर २७ मे रोजी सलमान याने आपला साथीदार नवाब याच्या मदतीने आपल्या पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला. तीचे शव बेडशीटमध्ये गुंडाळून गोणीत भरले.नंतर सेलोटेपने लपेटून मुंब्रा रेतीबंदर येथे टाकले. दोन्ही आरोपीना १७ जुन पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.


रेतीबंदर खाडी झाली मृतदेह टाकण्याची जागा :ठाण्यातील प्रसिद्ध व्यापारी मनसुख हिरे यांची हत्या करून पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी रेतीबंदर येथेच मृतदेह टाकला होता त्यानंतर अनेकदा या ठिकाणी हत्या आणि आत्महत्या चे मृतदेह सापडलेले आहेत दरम्यान या रेतीबंदर परिसरामध्ये पोलिसांची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी हत्येचे मृतदेह टाकले जातात आणि आत्महत्या देखील केल्या जात असल्याचे समोर आलेले आहे. त्याच्या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हेगार शोधला मात्र हे प्रकार रोखण्यासाठी कायमस्वरूपी ठोस उपाय योजना करण्याची मागणी रेतीबंदर परिसरामध्ये राहणारे लोक करत आहेत.


हेही वाचा - Hyderabad Girl Killed In London : हैदराबादच्या विद्यार्थिनीची लंडनमध्ये हत्या, ब्राझीलच्या तरुणाला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details