महाराष्ट्र

maharashtra

Suspected Bomb : नवी मुंबईत बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन; चौकशीत माहिती उघड

By

Published : May 24, 2023, 10:12 PM IST

Updated : May 24, 2023, 10:34 PM IST

Etv Bharat
Etv Bharat

खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेंभोडे गावात संशयित बॉम्ब सापडल्याची माहिती पोलिसांना देण्यात होती. बॉम्ब शोध पथकासह पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासानंतर बॉम्ब बनावट असल्याचे आढळून आले. तर पुढील तपास सुरू आहे.

ठाणे: आजकालच्या कोण काही करेल यांचे नेम नाही. कधी काय करतील हे सांगता येत नाही. यामुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांना बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा मॅसेज केल्याने पोलीस दलात अनेक वेळा खळबळ उडाली होती. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेंभोडे गावात संशयित बॉम्ब सापडल्याची माहिती पोलिसांना देण्यात होती. बॉम्ब शोध पथकासह पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपासानंतर बॉम्ब बनावट असल्याचे आढळून आले. तर पुढील तपास सुरू आहे.

मीरा-भाईदरमध्ये बॉम्बस्फोट होणार: या आधीही अशाच घटना घडल्या होत्या. मुंबई पोलीस सहआयुक्तांना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. मीरा-भाईदरमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे, असे त्याने सांगितले होते. तसेच तेथे घटनास्थळी तातडीने पोलीस पाठवण्यास सांगितले होते. पोलीस सहआयुक्तांनी त्याला अधिक विचारणा केली असता त्याने अपशब्द वापरून फोन कट केला होता. सहपोलीस आयुक्तांनी ही माहिती मुंबई पोलीस नियंत्रणाला दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ मीरा भाईंदर पोलीस नियंत्रणेला माहिती दिली होती. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नैराश्यातून ही धमकी दिली: मुंबईत बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाच्या मुंबई एटीएसने मुसक्या आवळल्या होत्या. श्रीपाद गोरठकर असे त्या धमकी देणाऱ्या तरुणाचे नाव होते. तर मुंबई एटीएसने त्याला अटक केली होती. श्रीपाद गोरठेकरने परीक्षेत नापास झाल्याच्या नैराश्यातून ही धमकी दिली होती. मात्र या गंभीर प्रकरणाचा शोध घेऊन मुंबई पोलीस आणि नांदेडच्या 'दहशतवाद विरोधी पथकाने नायगाव तालुक्यातील नावंदी येथील श्रीपादला अटक केली होती. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याच्या चर्चेचीही त्याच्याकडे कसून चौकशी गेली.

  1. हेही वाचा -
  2. Mumbai Police मीराभाईदरमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा सहपोलीस आयुक्तांना फोन पोलिसांकडून तपास सुरू
  3. Bomb Blast Threat In Mumbai जेजे रुग्णालय भेंडीबाजार आणि नळबाजार परिसरात बॉम्बस्फोट करणार हॉक्स कॉलरला अटक
  4. Joint CP Got Bomb Threat Call खळबळजनक आमदार मानेंच्या मोबाईलवरून सहपोलीस आयुक्तांना कॉल
Last Updated :May 24, 2023, 10:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details