महाराष्ट्र

maharashtra

Religion Conversion : राज्यात का गाजतोय धर्मांतराचा मुद्दा?, जाणून घ्या काय आहेत धर्मांतराची कारणे

By

Published : Jun 12, 2023, 10:13 PM IST

ठाण्यात ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप द्वारे अल्पवयीन मुलांच्या धर्मांतराचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी जोर पकडते आहे.

Religion Conversion
धर्मांतर

पहा काय म्हणाले जाणकार

ठाणे :आजएकविसाव्या शतकात भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न आहे. मात्र भारतात गरीबी अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. याच गरिबीचा फायदा घेत भारतात मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जात आहे. एका विशिष्ट धर्मातील लोकांना विविध अमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याच्या घटना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. मात्र धर्मांतर केले तरी त्या लोकांच्या हाती प्रत्यक्षात काहीच लागत नसल्याने धर्मांतराचे एक विदारक चित्र सध्या महाराष्ट्रामध्ये उभे राहिले आहे.

धर्मांतर बंदी कायदा लागू करण्याची मागणी : उत्तर प्रदेशात धर्मांतर बंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील अशाच प्रकारचा कायदा लागू व्हावा, अशी मागणी जाणकारांकडून करण्यात आली आहे. देशभरात ख्रिश्चन मिशनरीज आणि मुस्लिम समाजाकडून वारंवार धर्मांतर केली जात असल्याचा आरोप हिंदू संघटना करत आहेत. यावरून काही दिवसांपूर्वी मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात देखील धर्मांतर विरोधी कायद्याची मागणी करण्यात आली होती.

धर्मांतरासाठी प्रेमाचा आधार घेतला जातो : तरुण मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्नाच्या आमिषाने त्यांचे धर्मांतर केले जाते. तसेच त्यानंतर त्या मुलींचा छळ केला जात असल्याचा प्रकार देखील पाहायला मिळाला आहे. त्यामुळे राज्यात धर्मांतर बंदी कायदा लागू होणे अत्यंत महत्त्वाचा असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. देशात महाराष्ट्राची ओळख पुरोगामी राज्य म्हणून आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र धर्मांतरासारखा ज्वलंत प्रश्न आता महाराष्ट्रासमोर येऊन ठेपलेला आहे. या प्रश्नावरून राज्यात दंगली होतील की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

धर्मांतराची कारणे :

  1. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे व गरीबीमुळे सर्वाधिक धर्मांतर होतात.
  2. पैशाचे अमिष दाखवूनही धर्मांतर केले जाते.
  3. प्रेमाचे जाळे टाकून तरुण मुलींचे धर्मांतर केले जाते.
  4. हिंदू मॅरेज ॲक्टच्या कारवाईला टाळण्यासाठी देखील अनेक जण धर्मांतर करतात.
  5. स्वधर्मात योग्य मानसन्मान न मिळाल्याने धर्मांतर केले जाते.
  6. एखाद्या धर्माबद्दल आदर निर्माण झाल्याने देखील धर्मांतर केले जाते.

हेही वाचा :

  1. Online Game Conversion Case: 'ऑनलाइन गेम' धर्मांतरण प्रकरण; घटनेचे धागेदोरे मुंबईमध्ये असल्याचे उघड

ABOUT THE AUTHOR

...view details