महाराष्ट्र

maharashtra

आपल्या गावी जाण्यास पास मिळवण्यासाठी परप्रांतीयांची पोलीस ठाण्यासमोर लांबच-लांब रांग

By

Published : May 3, 2020, 9:40 AM IST

वर्तकनगर भागात दाट वस्ती मोठी असून या भागात परराज्यातील नागरिकांची संख्या मोठी आहे. आपल्या गावी जाण्याकरता परवानगी मिळत आहे, यासाठी या नागरिकांनी लांबच लांब रांग लावल्याचे दिसून आले.

वर्तकनगर
वर्तकनगर

ठाणे - परराज्यात, जिल्ह्यात अडकलेल्यांना आपल्या गावी जाण्याकरता सरकारने परवानगी दिली आहे. याकरता जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये आपली नोंद करावी, ही बातमी कळताच अनेक परराज्यातील नागरिकांनी पोलीस ठाण्यांसमोर एकच गर्दी करायला सुरुवात केली.

असेच एक दृश्य पहायला मिळाले ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये, शनिवारी दुपारी अचानक परराज्यातील नागरिकांनी पोलीस ठाण्यामध्ये अर्ज करण्यासाठी गर्दी केली. वर्तकनगर भागात दाट वस्ती मोठी असून या भागात परराज्यातील नागरिकांची संख्या मोठी आहे. आपल्या गावी जाण्याकरता परवानगी मिळत आहे, यासाठी या नागरिकांनी लांबच लांब रांग लावल्याचे दिसून आले.

दरम्यान, शनिवारी राज्यात कोरोनाबाधित ७९० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या १२ हजार २९६ झाली आहे. तर एकूण ९ हजार ७७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details