महाराष्ट्र

maharashtra

उल्हासनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक

By

Published : Aug 22, 2019, 7:18 PM IST

Updated : Aug 22, 2019, 7:43 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीविरोधात उल्हासनगरमधील मनसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. लाल चौकी परिसरात मनसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. हे आंदोलन बेकायदेशीर ठरवत विठ्ठलवाडी पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक

ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीविरोधात उल्हासनगरमधील मनसैनिकांनी जोरदार आंदोलन केले. लाल चौकी परिसरात मनसैनिकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. हे आंदोलन बेकायदेशीर ठरवत विठ्ठलवाडी पोलिसांनी उल्हासनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह दहा ते बारा मनसैनिकांना ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगरमध्ये आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाजपविरोधी भूमिकेमुळे त्यांना निशाणा केले जात आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या मागे चौकशी सत्र सुरू केल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासून मुंबईतील ईडीच्या कार्यालयात कसून चौकशी सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Intro:किट 319


Body:उल्हासनगरात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना अटक

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टीव्हीच्या चौकशी फेऱ्यात फडकवणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात उल्हासनगरमधील मनसैनिकांनी निषेध करीत जोरदार आंदोलन केले, मात्र हे आंदोलन बेकायदेशीर ठरवत विठ्ठलवाडी पोलिसांनी 10 ते 12 मनसैनिकांना ताब्यात घेऊन अटक केली आहे,

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेले सभांमुळे त्यांचा लाव रे तो व्हिडीओ हे वाक्य चांगलेच चर्चेत आले होते तसेच राज ठाकरे यांनी प्रत्येक सभेमध्ये मोदी व फडवणीस सरकार विरोधात वक्तव्य केल्याने राज ठाकरे विरुद्ध भाजप असा राजकीय फड रंगला होता, आता विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने राज ठाकरे यांच्या मागे चौकशी सत्र सुरू केल्याचा आरोप सध्या सर्वच विरोधक करीत आहेत, मात्र राज ठाकरे यांच्या चौकशीच्या फेऱ्यात आमचा काही हस्तक्षेप नसल्याचा सांगणाऱ्या भाजपला मनसैनिकांनी टीकेचे धनी केले आहे,
राज ठाकरे यांची आज सकाळी साडेअकरा वाजल्यापासून मुंबईतील ईडी च्या कार्यालयात कसून चौकशी सुरू आहे, या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे,
दरम्यान उल्हासनगरमधील लाल चौकी परिसरात मनसैनिकांनी आंदोलन करीत सरकारविरोधात घोषणाबाजी केली, यामुळे हे आंदोलन बेकायदेशीर ठरवत विठ्ठलवाडी पोलिसांनी उल्हासनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष बंडू देशमुख यांच्यासह दहा ते बारा मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे,
ftp fid ( 1 bayet, 2 vis )
mh_tha_1_ulhasnagar_mns_andolan_1_bayet_2_vis_mh_10007


Conclusion:
Last Updated : Aug 22, 2019, 7:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details