महाराष्ट्र

maharashtra

राष्ट्रपतींच्या हस्ते नाशिकमधील काळाराम मंदिरात महाआरती करणार - उद्धव ठाकरे

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 13, 2024, 10:16 PM IST

Updated : Jan 13, 2024, 10:31 PM IST

Uddhav Thackeray : भाजपानं राष्ट्रपतींना मान दिला नसला, तरी आम्ही तसं करणार नाही. येत्या 22 जानेवारीला नाशिकमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते महाआरती करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. नाशिकला जायच्या आधी शिवनेरीवर जाऊन शिव मंदिराचं दर्शन घेणार असल्याचंही ठाकरे म्हणाले.

Thackeray
उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांचं भाषण

ठाणेUddhav Thackeray:भाजपानं राष्ट्रपतींचा आदर केला नसला, तरी आम्ही तसं करणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तसंच नाशिकच्या काळाराम मंदिरात जाण्यापूर्वी शिवनेरीला जाऊन शिव मंदिराचं दर्शन घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. ते शनिवारी (13 जानेवारी) ठाण्यात बोलत होते.

राष्ट्रपतींच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरती : आधीच्या मंदिरांची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते होत असेल, तर राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते का होत नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केलाय. भाजपा राष्ट्रपतींचा आदर करत नसेल, मात्र आम्ही करणार नाही, असंही ठाकरे म्हणाले. 22 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात महाआरतीचा कार्यक्रम राष्ट्रपतींच्या हस्ते होणार असून, त्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिलीय.

अटलबिहारी वाजपेयींचा फोटो गायब :"शिवडी न्हावा शेवा महामार्गावरील अटल सागरी सेतूच्या उद्घाटनावेळी फक्त नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला होता. तिथं अटलबिहारी वाजपेयींचा फोटो लावण्यात आलेला नाही. आम्ही 22 जानेवारीला नाशिकमध्ये कार्यक्रमाचं निमंत्रण राष्ट्रपतीला देणार आहोत. नाशिकमध्ये आम्ही राष्ट्रपतींच्या हस्ते आरती करू. त्यावेळी फक्त त्यांचाच फोटो काढला जाईल, आमचा कोणाचाही फोटो काढला जाणार नाही, असं देखील ठाकरे म्हणाले.

देशाच्या अस्मितेचा उत्सव :अयोध्येतील राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा ही केवळ राम मूर्तीचीच नाही, तर देशाची प्राणप्रतिष्ठा आहे. देशाच्या अस्मितेच्या महत्त्वाच्या प्रतिष्ठेचा हा उत्सव आहे. यावेळी राष्ट्रपतींना अयोध्येला बोलावण्यात यावं. आम्ही काळाराम मंदिरात आरती करणार आहोत, त्या वेळी राष्ट्रपतींनी उपस्थित राहावे, अशी आमची इच्छा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात कार्यक्रम करत आहोत, तसंच राष्ट्रपतींना रितसर निमंत्रणही देत आहोत. आमचे खासदार राष्ट्रपतींना विधिवत निमंत्रण देतील. त्यामुळं आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी यावं, अशी आमची मागणी आहे - उद्धव ठाकरे

दांभिकपणामुळं भाजपाला सोडचिठ्ठी :भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचं हिंदुत्व वेगळं आहे. हिंदुत्वामुळं आम्ही भाजपाला सोडलं नाही, त्यांच्या दांभिकपणामुळं आम्ही भाजपाला सोडचिठ्ठी दिलीय. देश वाचवण्यासाठी रामभक्त एकत्र आले. राममंदिराची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, आता हे सरकार त्याचं श्रेय घेत आहे, असा आरोप त्यांनी भाजपावर केलाय.

शिवनेरीला जाणार :राम मंदिराच्या कार्यक्रमासाठी 22 जानेवारीला नाशिकला जाणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले, मात्र त्याआधी शिवनेरीला जाणार आहेत. अयोध्येला जाण्यापूर्वी आम्ही शिवमंदिराची माती घेतली होती, त्यानंतर वर्षभरातच राम मंदिराचा निकाल लागला, असं ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. 'लवासा जमीन घोटाळ्याची श्वेतपत्रिका काढू' तलाठी भरती परीक्षेवरून विखे पाटील आक्रमक
  2. उद्धव ठाकरे काळारामाचे नव्हे तर तळीरामाचे भक्त, आशिष शेलार यांची टीका
  3. नायलॉन मांजा वापराल तर खबरदार, मुंबई पोलिसांनी घातली बंदी
Last Updated : Jan 13, 2024, 10:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details