महाराष्ट्र

maharashtra

Murder in Thane : ठाण्यात गँगवॉर? प्रतिस्पर्धी टोळीकडून अल्पवयीन गुन्हेगाराचे अपहरण करून खून

By

Published : Aug 19, 2023, 6:43 PM IST

प्रतिस्पर्धी टोळीतील एका अल्पवयीन गुन्हेगारावर प्राणघातक हल्ला केल्याचा बदला म्हणून त्या टोळीतील सदस्यांनी मोक्क्याच्या गुन्ह्यातील एका अल्पवयीन गुन्हेगाराचे अपहरण केले. यानंतर त्याची निर्घृणपणे हत्या केली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली परिसरात काल (शुक्रवारी) सायंकाळी घडली. या प्रकरणी ४ जणांना अटक केली आहे.

Juvenile Delinquent Murder
हत्याकांड

हत्या प्रकरणी पोलीस उपआयुक्तांची प्रतिक्रिया

ठाणे : एका १७ वर्षीय अल्पवयीन सराईत गुन्हेगाराची प्रतिस्पर्धी टोळीतील १० हल्लेखोरांनी मिळून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्व भागातील खडेगोळवली परिसरात असलेल्या एका उद्यानात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी आतापर्यंत चार हल्लेखोरांना अटक केली आहे.

मृतक मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी :अटक केलेल्या चारपैकी दोन हल्लेखोर अल्पवयीन आहेत. तर मृतक अल्पवयीन गुन्हेगार हा मोक्का गुन्ह्यातील आरोपी असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ८ गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या हत्याकांडामुळे कल्याण पूर्व भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

'या' कारणामुळे हत्या :पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक अल्पवयीन गुन्हेगार हा कल्याण पूर्वेकडील कैलाश नगरमध्ये कुटुंबासह राहात होता. त्याची या परिसरात मोठी दहशत होती. शिवाय प्रतिस्पर्धी गुन्हेगारांच्या टोळीत नेहमीच लहान-मोठ्या वादात एकमेकांवर हल्ले करण्यात तो पुढे होता. त्यातच तीन महिन्यांपूर्वी प्रतिस्पर्धी गुन्हेगारांच्या टोळीत एका अल्पवयीन गुन्हेगारावर त्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील त्या अल्पवयीन गुन्हेगाराने १० साथीदारांच्या मदतीने याचे १८ ऑगस्ट रोजी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कैलाश नगर परिसरातून अपहरण केले. त्यानंतर खडेगोळवली परिसरात असलेल्या मंगेशी गार्डन येथे नेऊन त्याला बेदम मारहाण करत त्याचा खून केला.

एकाला अटक :घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले; मात्र तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले होते. परंतु, एका हल्लेखोराला पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले. तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मारहाण झालेल्या गुन्हेगाराला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर मृतकाच्या नातेवाईकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात १० हल्लेखोरांवर हत्येसह अपहरणाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आतापर्यंत चार हल्लेखोरांना अटक केल्याची माहिती कल्याण पोलीस परिमंडळाचे पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली. घटनेचा तपास सुरू आहे.

हेही वाचा:

  1. Minor Girl Murder Thane: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची हत्या करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
  2. Poisoning On Husband : कलीयुगी पत्नीचा प्रताप! इंजिनियर पतीसह सासूवर विषप्रयोग करून जीवे मारण्याचा प्रयत्न
  3. Murder Over Money Dispute: पैशाच्या कारणावरून भररस्त्यात गोळीबार करून साथीदाराचा खून; आरोपीस आठ तासात अटक

ABOUT THE AUTHOR

...view details