महाराष्ट्र

maharashtra

दारू आणायला उशीर केल्याने पत्नीची हत्या; पती गजाआड

By

Published : Jun 16, 2019, 8:19 PM IST

दारू आणायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीस लाकडी काठीने बेदम मारहाण केली. य़ात पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून आरोपी प्रवीणला मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपी प्रवीण पुरबिया

ठाणे - दारू आणायला उशीर झाला म्हणून पतीने पत्नीस बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. संतोषी पुरबिया असे मृत विवाहितेचे नाव आहे. तर प्रवीण पुरबिया असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे हत्येचा हा प्रकार त्याच्या सात वर्षीय मुलीने दिलेल्या माहितीनंतर उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपी प्रवीणला मुंब्रा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दारू आणण्यास उशीर झाल्याने पतीने केली पत्नीची हत्या


प्रवीण हा मुंब्रा येथील अमृतनगर परिसरात त्याची पत्नी संतोषी आणि दोन मुलांसह राहतो. गुरूवारी रात्री त्याने पत्नीला दारू आणण्यास पाठवले होते. मात्र, तिला दारू आणण्यास उशीर झाला. या कारणावरून प्रवीणने संतोषीला काठीने बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा त्याची दोन्ही मुले घरातच होती.


या हत्याप्रकरणात तो अडकला जाऊ नये म्हणून त्याने पत्नी संतोषीने विष पिऊन आत्महत्या केली असल्याचा बणाव केला. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याच्या सात वर्षीय मुलीकडे याबाबत चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याआधारे मुंब्रा पोलिसांनी प्रवीण विरोधात गुन्हा दाखल केला असून या गुह्यात पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Intro:दारू आणण्यास उशीर झाल्याने पतीने केली पत्नीची हत्याBody:दारू उशीरा आणली म्हणून पतीने पत्नीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी प्रवीण पुरबिया याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. विशेष म्हणजे हत्येचा हा प्रकार त्याच्या सात वर्षीय मुलीने दिलेल्या माहितीनंतर उघडकीस आला आहे.
मुंब्रा येथील अमृतनगर परिसरात प्रवीण हा त्याची पत्नी संतोषी आणि दोन मुलांसह राहतो. गुरूवारी रात्री त्याने पत्नीला दारू आणण्यास पाठवले होते. मात्र, तिला दारू आणण्यास उशीर झाला. या कारणावरून प्रवीणने संतोषीला लाकडी काठीने बेदम मारहाण केली. ही मारहाण इतकी गंभीर होती की यात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडली त्यावेळी त्याची दोन्ही मुले घरात होती. या हत्येप्रकरणात पकड़ले जाऊ नये म्हणून संतोषीने विष पिऊन आत्महत्या केल्याचा बनाव प्रवीणने केला. मात्र, पोलिसांना ही हत्या असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्याच्या सात वर्षीय मुलीकड़े याबाबत चौकशी केली. त्यावेळेस तिने घड़लेल्या प्रकाराची सर्व माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर हा प्रकार उघड़किस आला. त्याआधारे मुंब्रा पोलिसांनी प्रवीण विरोधात गुन्हा दाखल केला असून या गुह्यात पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Byte - मधुकर कड ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंब्रा,ठाणे )
Conclusion:null

ABOUT THE AUTHOR

...view details