महाराष्ट्र

maharashtra

Gang Rape In Thane: डोंबिवलीत १९ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्कार

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 9:27 PM IST

ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात राहणाऱ्या एका १९ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली (rape accused arrested) आहे. आरोपींनी पीडित विवाहितेच्या पतीला पार्टी करण्याच्या बहाण्याने दारू आणण्यासाठी घराबाहेर पाठवले. याचाच फायदा घेऊन दोघा (rape victim husband beaten) नराधमांनी पीडित विवाहितेवर बलात्कार केला. खळबळजनक बाब म्हणजे, या दोन्ही नराधमांच्या तावडीतून सुटून पीडितेने घराबाहेर मदतीसाठी पळ काढला होता. मात्र पुन्हा तिचा पाठलाग करून व तिला एका रिक्षात कोंबून रिक्षातच तिच्यावर बलात्कार केला गेला.

Gang Rape In Thane
पीडिता

ठाणेGang Rape In Thane:या प्रकरणी पीडितेने विष्णूनगर पोलीस ठाण्यात दोन नराधमांविरोधात बलात्काराची तक्रार देताच विष्णूनगर पोलिसांनी दोघांपैकी एक नराधमाला अटक केली आहे. दिनेश गडारी असे अटक नराधमाचे नाव आहे. तर सुनील राठोड हा नराधम फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम भागातील कुंभारखाण पाडा भागात असलेल्या एका खोलीत पीडित विवाहिता तिच्या पती सोबत राहत आहे. त्यातच काही दिवसांपासून पीडित राहत असलेले भाड्याचे घर सोडण्याच्या तयारीत होती. त्यावेळी तिने तिच्या घरातील साहित्य आणि कपडे तिच्या पतीच्या ओळखीचा असलेला नराधम दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते.

दारु आणण्यासाठी पतीला पाठविले:दरम्यान १७ सप्टेंबरच्या संध्याकाळच्या सुमारास पीडित विवाहिता आणि तिचा पती असे दोघे दिनेशच्या घरी ठेवलेले घरातील साहित्य आणि कपडे आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी नराधम दिनेश आणि त्याचा साथीदार नराधम सुनील हे दोघे घरी होते. या दोघांनी पीडित विवाहितेच्या पतीला पार्टी करण्याच्या बहाण्याने दारु आणण्याकरिता सांगत घराबाहेर पाठवले. त्यामुळे मित्राने सांगितल्यानं पीडितेच्या पती दारू आणण्यासाठी घराबाहेर निघून गेला होता.

जाब विचारल्याने पतीला मारहाण:त्यानंतर मित्राच्या घरात विवाहिता एकटीच असल्याचा फायदा घेत, नराधम दिनेश गडारी याने विवाहितेवर बलात्कार केला. खळबळजनक बाब म्हणजे, या नराधमांच्या तावडीतून सुटून पीडित विवाहितेने घराबाहेर मदतीसाठी पळ काढला होता. मात्र, पुन्हा तिचा पाठलाग करून नराधम सुनील राठोड याने तिला रिक्षात कोंबले आणि रिक्षातच तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीवर बलात्कार केल्याचा जाब नराधमांना विचारणाऱ्या पतीलाही दोघा नराधमाने मिळून बेदम मारहाण केली.

पोलीस फरार आरोपीच्या मागावर:पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून विष्णूनगर पोलीस ठाण्यात अत्याचार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरिक्षक मोहन खंदारे आणि महिला पोलिस अधिकारी मेघा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असता पोलिसांनी दिनेश गडारी याला आज अटक केली आहे. तर त्याचा साथीदार नराधम सुनील राठोड फरार झाला आहे. पोलिसांचे एक पथक त्याला अटक करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक मोहन खंदारे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. Thane Murder News : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या प्रकरण; प्रियकराला पश्चिम बंगालमधून अटक
  2. Mumbai Crime News : धावत्या टॅक्सीमध्ये अल्पवयीन दिव्यांग मुलीवर अत्याचार; दोन तासात आरोपींना बेड्या
  3. Little Girl Rape Case : चॉकलेटच्या बहाण्याने चिमुरडीवर अत्याचार करून हत्या, नराधमाला बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांनी वापरली 'ही' युक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details