महाराष्ट्र

maharashtra

गणेशोत्सवाच्या दरम्यान फुलांचे दर भिडले होते गगणाला; उद्यापासून किंमतीत घट होण्याची शक्यता

By

Published : Sep 19, 2021, 10:30 AM IST

thane latest news

साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत असला तरीदेखील बाजारात येणाऱ्या फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाले आहे. गणेश उत्सवाच्या काळात मुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे 40 ते 50 रुपयांनी फुलांच्या दरात वाढ झाल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, गणेश विसर्जनानंतर हे दर घटण्याची शक्यता आहे.

ठाणे -श्रावण महिना सुरू झाला की सण-उत्सवाला मोठ्या प्रमाणात सुरुवात होत असते. याच काळात गणेशोत्सवानंतर दसरादेखील येत असतो. याच सण उत्सवाच्या काळात फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली की त्याचे दरदेखील वाढतात. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे राज्य सरकारने सण आणि उत्सवावर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले आहेत. त्यामुळे साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने केले आहे. साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत असला तरीदेखील बाजारात येणाऱ्या फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाले आहे. गणेश उत्सवाच्या काळात मुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे 40 ते 50 रुपयांनी फुलांच्या दरात वाढ झाल्याचे फुल विक्रेत्यांनी सांगितले. मात्र, गणेश विसर्जनानंतर हे दर घटण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी सर्व प्रकारचे झेंडू केवळ ५ ते १० रुपये किलोने विकले जात होते. परंतु नव्याने दाखल झालेल्या फुलांची ग्राहकांकडून चांगली मागणी असून सध्या ५० ते ७० रुपयांनी झेंडू विकला जात आहे. यामुळे सर्व व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर ग्राहकांनादेखील परवडणाऱ्या दरात चांगल्या प्रतीचा झेंडू मिळत असल्याने ग्राहकांकडूनदेखील फुलांची चांगली खरेदी होत आहे. झेंडूबरोबरच गुलाब, शेवंती, मोगरा, अष्टर या फुलांचीदेखील चांगल्या भावाने विक्री होत असल्याचे फूल व्यापाऱ्यांनी सांगितले. मागचे काही दिवस कवडीमोल भावात फुलांची विक्री करावी लागत होती. यामुळे सर्व व्यापारी आर्थिक संकटात सापडले होते. मात्र, या काळात फुलांचा दर वाढल्याने फुल विक्रेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

आता मागणी घटणार? -

श्रावणात फुल बाजारांमध्ये फुलांची आवक ही पावसामुळे कमी होते आणि त्यामुळे फुलांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. आता मात्र मागणी कमी झाल्यामुळे फुलांच्या किमती या कमी होणार असून येणाऱ्या पितृपक्षामध्ये फुलांची आवश्यकता नसते, त्यामुळे मागणीही घटल्यामुळे फुलांचे दर हे कोसळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- २१७ वर्षांपासून नाईक कुटुंबात पर्यावरणपूरक गणपती बाप्पाचे आगमन

ABOUT THE AUTHOR

...view details