महाराष्ट्र

maharashtra

Navaratri 2022 : नवरात्री उत्सवात ठाण्यातील पूजा साहित्य विक्रेत्यांना सोन्याचे दिवस

By

Published : Sep 22, 2022, 5:45 PM IST

नवरात्री साठी ( Navratri Festival ) पूजा विक्रीती दुकान सजली असून नवरात्र उत्सवासाठी लागणारे सर्व साहित्य आता मार्केट मधे उपलब्ध आहेत. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडी नंतर बाजारपेठा ( Thane Market ) पूजा साहित्याने सज्ज झाले असून दुकानदारांना सोन्याचे दिवस येणार आहेत. ( Golden Days For Puja Material Sellers )

Golden Days For Puja Material Sellers
ठाण्यातील पूजा साहित्य विक्रेत्यांना सोन्याचे दिवस

ठाणे -गेले २ वर्ष कोरॉना काळात सन उत्सवांवर निर्बंध असल्याने नागरिक कोणताही उत्सव ( Navratri Festival ) मोठ्या प्रमाणात साजरा करू शकले नहित. याचाच परिणाम पूजा साहित्य विक्रेत्यांवर झाला. कोरोना काळात सण उत्सव नागरिक साजरे करत नसल्याने विक्रेत्यांना नुकसान झाले असल्याचे, विक्रेत्यांनी सांगितले. तसेच आता उत्सवांवरचे निर्बंध हटवल्याने गणेशोत्सव, दहीहंडी मधे ज्या प्रमाणे फायदा झाला. त्याच प्रमाणे नवरात्र उत्सवसाठी ग्राहकांच्या मागणीत वाढ झाली आहे. नवरात्र साठी पूजा साहित्याने दुकाने सजली असून नवरात्र उत्सवासाठी लागणारे सर्व साहित्य आता मार्केट मधे उपलब्ध आहेत. त्यामुळे गणेशोत्सव, दहीहंडी नंतर बाजारपेठा ( Thane Market )पूजेच्या साहित्याने सज्ज असून दुकानदारांना सोन्याचे दिवस येणार आहेत. ( Golden Days For Puja Material Sellers )

नवरात्री उत्सवात ठाण्यातील पूजा साहित्य विक्रेत्यांना सोन्याचे दिवस



वस्तूंची मागणी दिवसेंदिवस वाढत - राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आता सण उत्सव मोठ्या जोमान साजरे केले जात आहेत आणि यामुळेच राज्यभरातल्या अनेक कष्टकरी जनतेला याचा फायदा मिळत आहे. यामध्ये शेतकरी वर्ग आहे. विक्रेता वर्ग आहे. व्यापारी वर्ग आहे. सोबत सर्वसामान्य नागरिक ही आहे. या सर्वांचा आता फायदा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण या सणा उत्सवाच्या निमित्ताने लागणाऱ्या सर्व वस्तूंची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे यामुळे पूर्णतः ठप्प झालेल्या व्यवसायांना आता सुविचे दिवस येऊ लागलेले आहेत. कोरोनाचे निर्बंध असताना व्यवसाय करायची परवानगी मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी उत्पादकांनी जोमाने कामाला लागायला सुरुवात केली. त्याच प्रमाणात मागणी देखील ग्राहकांकडून वाढल्यामुळे आता त्याचा परिणाम सर्वच व्यवसायावर दिसून येत आहे.



उत्पादन आणि विक्री ही जोमात -काही दिवसांवर येऊ घातलेला नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने लागणाऱ्या सर्व वस्तू मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध झालेल्या आहेत. यामध्ये पूजेचे साहित्य असेल, देवीची उपासना करण्यासाठीचे साहित्य असेल, हे सर्वच आता मुबलक प्रमाणात उपलब्ध झालेले आहे. विक्रीसाठी व्यापाऱ्यांनी मोठा स्टॉक देखील करून ठेवलेला आहे. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन विक्रेते यासाठी उचित उपाययोजना करत देखील आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details