महाराष्ट्र

maharashtra

संजय राऊतांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी; भाजपकडून निवेदन

By

Published : Aug 21, 2023, 9:29 PM IST

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्याविरुद्ध भाजपा आक्रमक झाली आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. संजय राऊतांना मनोरुग्णालयात दाखल करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली. (BJP Demand On Sanjay Raut)

BJP Demand On Sanjay Raut
भाजपचे निवेदन

संजय राऊतांविषयी ठाणे जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांची प्रतिक्रिया

ठाणे:बेताल व निराधार वक्तव्याने समाजात फुटीची बीजे रोवत समाजाच्या भावना भडकविणाऱ्या शिल्लक सेनेचे खासदार संजय राऊत यांची मानसिक स्थिती ढासळली आहे. त्यांना तातडीने मनोरुग्णालयात दाखल करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांकडे केली आहे. (BJP Demand On Sanjay Raut)

संजय राऊतांचा खटाटोप प्रसिद्धीसाठी:भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनोरुग्णालयाच्या अधीक्षकांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. महाराष्ट्राच्या राजकारणात नावापुरत्या असलेल्या शिल्लक सेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून सातत्याने बेताल व निराधार वक्तव्ये केली जात आहेत. केवळ प्रसारमाध्यमांत प्रसिद्धी करण्यासाठी नाहक टिप्पणी केल्या जात आहेत. तसेच महाराष्ट्रातील विविध लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि विविध समाजांविरोधात वक्तव्य करून समाजात दुही पसरविणे व समाजाच्या भावना भडकविण्याचे उद्योगही संजय राऊत यांच्याकडून केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात लिहिलेल्या अग्रलेखाविरोधात राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याकडे संजय वाघुले यांनी निवेदनात लक्ष वेधले आहे.

'ही' आहेत राऊतांची विवादित वक्तव्ये:गेल्या काही वर्षांत संजय राऊत यांच्याकडून अनेक बेजबाबदार वक्तव्य करण्यात आली आहेत. त्यातील काही वक्तव्ये पुढीलप्रमाणे आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावा मागणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला लक्ष्य करणे, मराठा समाजाच्या मोर्चावर टीका करणे, गुजराती समुदायावर टीका, विधिमंडळावर टीका, गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची जिवंत प्रेते आल्यानंतर शवागृहात पोस्टमार्टम करणार, राज्य सरकार बेकायदा असून त्यांचा आदेश पोलिसांनी पाळू नये, पत्रकारांच्या माईकवर थुंकणे, अत्याचार पीडित मुलीचे आक्षेपार्ह फोटो ट्विट करणे, केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवीगाळ करणे आदी वक्तव्ये करण्यात आली.

निवेदनातून 'ही' मागणी:वरील सर्व लक्षात घेता संजय राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळले असल्याचे स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर मानसिक उपचार करण्याची गरज आहे. तरी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाने संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हेही वाचा:

  1. उद्धव ठाकरे, संजय राऊतांना दिलासा; 100 कोटींच्या मानहानी खटल्यात जामीन मंजूर
  2. 'मी पण रोज मासे खातो, मग माझे डोळे...', नितेश राणेंचा विजयकुमार गावित यांना चिमटा
  3. विरोधकांच्या मुंबई बैठकीत सहभागी होणार का? केजरीवालांनी स्पष्टच सांगितले

ABOUT THE AUTHOR

...view details