महाराष्ट्र

maharashtra

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट पाकिस्तान सीमेवर, काय आहे विषय?

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 8:23 PM IST

Updated : Jan 7, 2024, 9:49 PM IST

CM Eknath Shinde Poster in Punjab : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर आता राज्यात नाही तर राज्याच्या बाहेर आणि पाकिस्तानच्या सीमेवरही झळकलेत. 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' असं लिहिलं असलेलं बॅनर कार्यकर्त्यांनी झळकावलंय.

CM Shinde's banner spotted on the Pakistan border
एकनाथ शिंदे यांचं पाक सीमेवर बॅनर

ठाणे CM Eknath Shinde Poster in Punjab : शिवसेनेचे शाखाप्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री असा प्रवास करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मानणारा वर्ग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. यामुळंच त्यांचे चाहते वारंवार त्यांच्याबद्दल असणारा आदर व्यक्त करण्यासाठी थेट लंडनपर्यंत बॅनर झळकवत आहेत. असाच काहीसा प्रत्यय आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या सीमेवरही पाहायला मिळालाय. शिवसेनेशी फारकत घेऊन आपला आमदारांचा गट घेऊन भाजपाशी हात मिळवणी केल्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. अनपेक्षितपणे एवढी मोठी जबाबदारी अंगावर पडल्यावर देखील त्यांनी न डगमगता आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत असल्याचं चित्र सध्या सर्वत्र दिसतंय. त्यामुळं त्यांची लोकप्रियता सतत वाढत असून, युवा वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडं आकर्षित होत आहे.

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्वाचा संदेश : २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना दिनी मुख्यमंत्री अयोध्येत जाणार असल्याने, त्यांचे बॅनर सर्वत्र झळकवण्याची तयारी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केलीय. पण शिवसेनेचा अमरावती निरीक्षक अमित जैस्वाल हा युवक एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं आपल्या नेत्याचा बॅनर थेट भारत-पाक सीमेवर झळकावलाय. या युवकानं शीख धर्मियांचं अत्यंत पवित्र स्थान समजल्या जाणाऱ्या कर्तारपूर साहेब गुरुद्वाराला भेट दिली. या भेटीवेळी त्यानं 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' हा संदेश देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बॅनर थेट भारत-पाक सीमेवर झळकवलाय. त्याच्या या बॅनरबाजीची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

राज्याबाहेरही बॅनर : एकनाथ शिंदे यांचे बॅनर्स ठाण्यात आणि महाराष्ट्रात लागायचे. मात्र, अयोध्या दौऱ्यानंतर संपूर्ण देशभरात मुख्यमंत्री शिंदे यांचे बॅनल लागत असल्याचं दिसून येत आहे. देशभरातच काय तर तिकडं लंडन, ऑस्ट्रेलियामध्येही शिंदे यांचे बॅनर लागल्याचं दिसून आलं होतं. आता तर पाकिस्तानच्या सीमेवरही चाहत्यांनी त्यांचं बॅनर झळकावलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यात जसे परदेशात बॅनर्स लागतात, तसे आता एकनाथ शिंदे यांचे बॅनर्सचाही चर्चेचा विषय झालाय.

Last Updated :Jan 7, 2024, 9:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details