महाराष्ट्र

maharashtra

डोंबिवली : औषध निर्माण कंपनीतील स्फोटात दोन कामगारांचा मृत्यूप्रकरणी कंपनी विरोधात गुन्हा दाखल

By

Published : May 4, 2019, 12:08 PM IST

कामगारांना सुरक्षिततेबाबत कोणतीही साधने न पुरवता कामे करवून घेतली. त्यामुळे झालेल्या स्फोटात या दोन्ही कामगारांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी क्रिष्णा इंटरप्रायझेसच्या विनोद राजभर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

कंपनीतील स्फोटात दोन कामगारांचा मृत्यूप्रकरणी कंपनी विरोधात गुन्हा दाखल

ठाणे - डोंबिवली-मानपाडा रोडला सांगाव येथिल औषध निर्माण करणाऱ्या एका कंपनीत शनिवारी रात्रीच्या सुमारास एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झालेल्या दुर्घटनेत जबर जखमी झालेल्या कमलेश यादव (२४) आणि गिरीवरधर यादव (२०) या दोन्ही कामगारांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात सुरक्षिततेची कोणतीही साधने न पुरवता एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरमध्ये गस रीफिलिंगचे काम करून घेत असल्याचा ठपका ठेऊन कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज २ ,प्लॉट नं. ए १ मध्ये डॉर्टमुंड लॅबोरेटरीज प्रा. लि. ही कंपनी कार्यरत आहे. या कंपनीत औषध निर्मिती करण्यात येते. शनिवारी रात्री या कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावरील एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरमध्ये खासगी ठेकेदाराच्या मार्फत गॅस भरण्याचे काम सुरू होते. एअरकंडिशनच्या या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात कमलेश यादव आणि गिरीधर यादव हे दोघे कामगार जबर जखमी झाले. या कामगारांना तत्काळ निवासी विभागातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कंपनीतील स्फोटात दोन कामगारांचा मृत्यूप्रकरणी कंपनी विरोधात गुन्हा दाखल

या दोन्ही कामगारांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी सकाळी साडेपाच वाजता दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलीस पुढील तपास करत होते. या ठिकाणी एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरमध्ये क्रिष्णा इंटरप्रायझेस या खासगी ठेकेदाराच्या मार्फत गॅस भरण्याचे काम सुरू होते. मात्र, या ठेकेदाराने या दोन्ही कामगारांना सुरक्षिततेबाबत कोणतीही साधने न पुरवता कामे करवून घेतली. त्यामुळे झालेल्या स्फोटात या दोन्ही कामगारांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी क्रिष्णा इंटरप्रायझेसच्या विनोद राजभर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

डोंबिवलीच्या औषध निर्माण कंपनीतील स्फोटातदोन कामगारांचा मृत्यू प्रकरणी कंपनी विरोधात गुन्हा दाखल

ठाणे : डोंबिवली-मानपाडा रोडला सांगाव येथिल औषध निर्माण करणाऱ्या एका कंपनीत शनिवारी रात्रीच्या सुमारास एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झालेल्या दुर्घटनेत जबर जखमी झालेल्या कमलेश यादव (२४) आणि गिरीवरधर यादव (२०) या उपचारादरम्यान दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात सुरक्षिततेची कोणतीही साधने न पुरवता एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरमध्ये गस रीफिलिंगचे काम करून घेत असल्याचा ठपका ठेऊनकंपनीच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली एमआयडीसीच्या फेज2 ,प्लॉट नं. ए1मध्ये असलेल्याडॉर्टमुंड लॅबोरेटरीज प्रा. लि. ही कंपनी मधील येथे कार्यरत आहे. या कंपनीत औषध निर्मिती करण्यात येते .शनिवारी रात्रीसदर कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावरील एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरमध्ये खासगी ठेकेदाराच्यामार्फत गॅस भरण्याचे काम सुरू होते. एअरकंडिशनच्या या कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात कमलेश यादव आणि गिरीधर यादव हे दोघे कामगार जबर जखमी झाल्याने या कामगारांना तात्काळ निवासी विभागातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या दोन्ही कामगारांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान रविवारी सकाळी साडेपाच वाजता दोन्ही कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. पोलीस पुढील तपास करत होते. या ठिकाणी एअरकंडिशनच्या कॉम्प्रेसरमध्ये क्रिष्णा इंटरप्रायझेस या खासगी ठेकेदाराच्यामार्फत गॅस भरण्याचे काम सुरू होते. मात्र या ठेकेदाराने या दोन्ही कामगारांना सुरक्षिततेबाबत कोणतीही साधने न पुरवता सदर काम करवून घेत होता. त्यामुळे झालेल्या स्फोटात या दोन्ही कामगारांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत क्रिष्णा इंटरप्रायझेसचे विनोद राजभर याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details