महाराष्ट्र

maharashtra

Pathaan Controversy : बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा पठाण विरोधात बॉक्स ऑफिसवर हल्ला, नऊ अटकेत

By

Published : Jan 30, 2023, 1:19 PM IST

भाईंदर पश्चिमेच्या मॅक्सेस मॉलमधील बॉक्स ऑफिसवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पठाण चित्रपट सुरू असताना तोडफोड करण्यात आली. संध्याकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pathaan Controversy
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा बॉक्स ऑफिसवर हल्ला

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा बॉक्स ऑफिसवर हल्ला

मीरा भाईंदर : बहूचर्चित चित्रपट पठाण सध्या चांगला चर्चेत आला आहे. एकीकडे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तर रविवारी भाईंदर पश्चिमेच्या मॅक्सेस मॉलमधील बॉक्स ऑफिसवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली. यावेळी भाईंदर पोलिसांनी नऊ बजरंग दलच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एकीकडे चांगली कमाई दुसरीकडे विरोध : पठाण चित्रपटाने आत्तापर्यंत 3०० कोटी रुपयांच्यावर कमाई केली आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असतानाच काही ठिकाणी विरोध देखील होत आहे. त्यातच रविवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान बजरंग दलच्या दहा ते पंधरा कार्यकर्त्यांनी भाईंदर पश्चिम येथील मॅक्सेस मॉल मधील बॉक्स ऑफिसवर धडक दिली. जय श्रीरामच्या घोषणा देत बॉक्स ऑफिसवर लागलेले पठाण चित्रपटाचे पोस्टर फाडण्यात आले. दगड व लाठ्याकाठ्यांनी किरकोळ तोडफोड करण्यात आली. सर्व चित्रपटगृहात स्थानिक पोलीस बंदोबस्तात असताना देखील बजरंग दलाचे कार्यकर्ते कसे पोहोचले? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.

पोलिसांकडून मुख्यसूत्रधाराचा तपास सुरू :या प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण यांचादेखील तपास पोलीस करत आहेत. मात्र बजरंग दलाचे शहर अध्यक्ष नरेश निळे यांच्यासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंदराव पाटील यांनी दिली.

कंगनाचे वादग्रस्त ट्विट : 'पठाण' चित्रपटाची सगळीकडे धूम असताना कंगनाने 'वादग्रस्त' ट्विटची मालिका सुरू ठेवली होती. 'काही लोक पठाणबाबत द्वेषावर प्रेमाचा विजय झाल्याचा दावा करीत आहेत. पण, प्रेम कोणाच्या द्वेषावर आहे? कोण तिकीट खरेदी करत आहे? कोण चित्रपट यशस्वी करीत आहे? हीच भारताची ओळख आणि प्रेम आहे. जिथे 80% हिंदू आहेत आणि तरीही पठाण नावाचा चित्रपट... रिलीज झाला आणि लोक पाहत आहेत. 'पण लक्षात घ्या की, पठाण हा फक्त एक चित्रपट असू शकतो, बाकी जास्त काही नाही. येथे फक्त जय श्री रामचा नारा दिला जाईल'. असे ट्विट कंगनाने केले होते.

जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला :'पठाण'च्या अफाट यशाने बॉलिवूडचा 'बादशाह' अर्थात शाहरुख खान पुन्हा एकदा भारतीय चित्रपटसृष्टीत चर्चेत आला आहे. 'पठाण' चित्रपटाने रिलीज झाल्यापासून (25 जानेवारी) दोन दिवसांत भारतात 106 कोटी आणि जगभरात 235 कोटींची कमाई केली होती. 25 जानेवारीला नॉन हॉलिडेला रिलीज झालेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 57 कोटी रुपयांचे खाते उघडले होते. दुसऱ्या दिवशी 70 कोटींची कमाई करीत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने जगभरात 300 कोटींचा टप्पा ओलांडला. भारतीय बॉक्स ऑफिसवर 150 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

हेही वाचा :Shah Rukh Khan Greeted Fans Video : पठाण चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख खानने चाहत्यांना 'मन्नत'मधून केले अभिवादन; पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details