महाराष्ट्र

maharashtra

corona : मुंब्र्यात जीवनावश्यक दुकानांव्यतिरिक्त खुली असणारी 20 दुकाने सील

By

Published : May 9, 2020, 11:09 AM IST

कोरोनाचा प्रसार वाढू नये यासाठी राज्यासह देशात टाळेबंदी करण्यात आली आहे. पण, यातून जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना, वाहतुकीला वगळण्यात आले आहे. तरीही काहीजण अत्यावश्यक सेवा नसतानाही दुकाने उघडली होती. मुंब्र्यातील अशी 20 दुकाने सील करण्यात आली आहेत.

shops sealed in Mumbra
दुकाने सील करताना

ठाणे -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना, उद्योग बंद ठेवण्यात आले आहेत. पण, मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रामध्ये काही ठिकाणी अत्यावश्यक सेवा नसतानाही दुकाने उघडण्यात आली होती. अशी 20 दुकाने पालिकेकडून सील करण्यात आली आहेत. तसेच शासकीय कामात अडथळा व रोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चौघांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील अंबिका स्वीट मार्ट-संजय नगर, विजय इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेअर, सलमान एन्टरप्रायजेस, ओमेजा सर्व्हीस सेंटर, जमान ऑटो पार्टस- गणेशभुवन, सिमरा बुक स्टॉल, रिगट पॅलेस मोबाईल स्टोअर्स, सुनिल लाईम डेपो -अचानकनगर, मदन चिकन शॉप-अलमास कॉलनी, चॉईस कॉर्नर-जीवनबाग, ए.एस. टेलिकॉम–मुंब्रा मार्केट रेल्वे ट्रॅकजवळ,‍ ‍स्टिल शॉप–खैरुनिसा बिल्डिंग, बाबाजी हार्डवेअर-आनंद कोळीवाडा, तंदुरी दरबार, मॉडर्न फूटवेअर-अमृतनगर, रिदा फॅशन सेंटर–किस्मत कॉलनी, रिहास वस्सुन केक-नॉशिन प्लाझा शॉप, कौसा, सुलतान मेन्स टेलर, रॉयल कल्केशन–रशिद कंपाऊंड नाका, जिओ इलेक्ट्रॉनिक्स–कौसा पेट्रोलपंपजवळील ही दुकाने सील करण्यात आली.

शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या व साथरोगप्रतिबंध कायद्याचे उल्लघंन करणाऱ्या अन्वर सय्यद, पापा, अब्दुल गनी मर्चंट, डॉ. एस.एफ. रजा, फैजान शेख यांच्यावर कलम 353 व 188 या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई महापालिका आयुक्त विजय सिंघल, सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर अभियंता धनंजय गोसावी यांनी केली.

हेही वाचा -नवीन रूग्णालयाच्या निधीवरून सेना-भाजपमध्ये जुंपली; राजकारण न करण्याचे महापौरांचे आवाहन

ABOUT THE AUTHOR

...view details