महाराष्ट्र

maharashtra

Solapur Ganeshotsav: मानाचा आजोबा गणपती १३८ वर्षांचा; टिळकांनी घेतली होती ‘आजोबा गणपती’ची प्रेरणा

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 2:31 PM IST

Solapur Ganeshotsav: सोलापुरात लोकमान्य टिळकांनी (Lokmanya Tilak) आजोबा गणपतीची (Ajoba Ganpati) प्रेरणा घेऊन, स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव (Ganeshotsav) सुरू केला आहे असं सांगण्यात येतं.

Solapur Ganeshotsav
सार्वजनिक आजोबा गणपती

माहिती देताना विश्वस्त सिद्धारूढ निंबाळे

सोलापूर Solapur Ganeshotsav: सर्वांच्या लाडक्या बाप्पाचं आज घराघरात मोठ्या जल्लोषात स्वागत होत आहे. ठिकठिकाणची सार्वजनिक मंडळ देखील बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाली आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील लोकमान्य टिळकांनी आजोबा गणपतीची प्रेरणा (Tilak Took Inspiration Ajoba Ganapati) घेऊन स्वातंत्रपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, असे सांगण्यात येते. म्हणजेच आपल्या देशातील सर्वात पहिला सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे श्री श्रद्धानंद समाजाचा सार्वजनिक आजोबा गणपती आहे.

मानाचा आजोबा गणपती १३८ वर्षांचा: सोलापुरातील मानाच्या आजोबा गणपतीला आज १३८ वर्ष पूर्ण झाली आहेत. लोकमान्य टिळकांनी १८९४ साली विंचूरकर वाड्यातून (Vinchurkar Wada) सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरोधात धार्मिक कार्यक्रमातून भारतीय एकता दाखवणे आणि इंग्रजाचा बिमोड करणे, हा त्यामागचा उद्देश होता. म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव ठिकठिकाणी सुरू झाला. लोकमान्य टिळकांनी एका कार्यक्रमात गणेशोत्सव कार्यक्रम एक दिवस ऑलम्पिकच्या बरोबरीने जगभर साजरा होईल, असे बोलून दाखवले होते.



आजोबा गणपतीचा इतिहास : भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापुरातील आजोबा गणपती मंडळ हे इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी संघटित शक्ती देत होते. लोकमान्य टिळक हे १८८५ साली सोलापूरला आले होते. लोकमान्य टिळक आणि सोलापुरातील प्रसिध्द उद्योगपती आप्पासाहेब वारद यांच्यात घनिष्ट मैत्री होती. टिळक हे सोलापूर येथे आल्यावर वारद यांच्या घरी वास्तव्य करत होते. जुन्या फौजदार चावडी जवळील श्रद्धानंद समाजाचे पसारे यांनी आपल्या घरी टिळकांना पान सुपारीसाठी आमंत्रित केले होते. अप्पा वारद आणि टिळक हे शुक्रवार पेठेतील आजोबा गणपती (Shukrawar Peth Ajoba Ganapati) व गणेशोत्सव समारंभात पान सुपारीला गेले आणि त्या कार्यक्रमात एकत्रित येणारे नागरिकाना पाहून लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचली, असे जुन्या पिढीतील लोकांकडून सांगितले जाते. त्यानंतर १८९४ सालापासून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.

परंपरेचा मानाचा आजोबा गणपती : सोलापुरातील श्री श्रद्धानंद समाजाच्या सार्वजनिक आजोबा गणपतीला मोठा इतिहास आहे. सोलापुरातील आजोबा गणपतीची स्थापना होऊन १३८ वर्ष पूर्ण झाली आहेत. जुन्या पिढीतील प्रमुख कार्यकर्त्यांनी व विविध घरातील व्यक्तींनी एकत्रित येऊन १८८५ मध्ये सार्वजनिक आजोबा गणपतीची प्रतिष्ठापना केली होती. आजोबा गणपतीची पहिली मूर्ती निलप्पा उजळमबे, आडव्याप्पा माळगे व आवटे या मूर्तिकाराकडून तयार करून घेण्यात आली होती.



इको फ्रेंडली गणेशोत्सव संकल्पनेचा निर्माता: सध्या सगळीकडे पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणेशोत्सव (Eco Friendly Ganpati) साजरा करण्याची मागणी होत आहे. मात्र १३६ वर्षांपूर्वी सोलापूरच्या आजोबा गणपती ट्रस्टने या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली आहे. १८८५ साली रद्दी कागद, कामट्या, खळ, डिंक, कापड अशा पर्यावरणपूरक साधनांचा वापर करून श्रींची सुंदर व सुबक मूर्ती तयार करण्यात आली होती.

हेही वाचा -

  1. Ganesh Chaturthi २०२३ : नवसाला पावणारा 'टेकडीचा गणपती'; सचिन तेंडुलकर देतो अवश्य भेट, जाणून घ्या इतिहास
  2. Ganesh Chaturthi २०२३ : यमराजाने स्थापित केलेला आशापूरक गणपती; जाणून घ्या आख्यायिका
  3. Ganesh Festival २०२३ : गणरायानं स्वप्नात येऊन सांगितलं मूर्तीचं गुपीत, वाचा खंडाळ्याच्या पावन गणपतीची आख्यायिका

ABOUT THE AUTHOR

...view details