महाराष्ट्र

maharashtra

Shopkeeper Beaten : इस्त्री केलेल्या कपड्यांचे पैसे मागितल्याने दुकानदाराला बेदम मारहाण

By

Published : Dec 30, 2022, 5:50 PM IST

शेटफळ नागोबा गावात एका इस्त्री दुकानदाराला चौघांनी मारहाण ( Shopkeeper assaulted ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ( video beating went viral on social media ) झाला आहे.

Shopkeeper Beaten
दुकानदाराला बेदम मारहाण

इस्त्री केलेल्या कपड्यांचे पैसे मागितल्याने दुकानदाराला बेदम मारहाण

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबा गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका इस्त्री दुकानदाराला चौघांनी मारहाण ( Shopkeeper assaulted ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल ( video beating went viral on social media ) झाला आहे. इस्त्री ( ironed clothes ) करायला आलेल्या चार जणांना दुकानदाराने आपली थकीत उधारी मागितल्यानं या चौघांनी दुकानदाराला लोखंडी गजाने मारहाण केली. दरम्यान याप्रकरणी कृष्णा सोनटक्के यांनी पोलिसांत या चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल करुन यांना अटक केल्याचंही पोलिसांनी माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर मारहाणीचा व्हिडीओ वायरल -करमाळा तालुक्यातील शेटफळ नागोबा येथे कपडे इस्त्री करून घेण्याच्या कारणावरून एका इस्त्री दुकानधारकाला चौघांनी मारहाण केली असल्याचा प्रकार घडला होता. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू करून चौघांवर त्याच दिवशी म्हणजे सोमवारी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली. मारहाण झालेले कृष्णा महादेव सोनटके यांनी याप्रकरणात फिर्याद दिली आहे.

26 डिसेंबर रोजी मारहाण झाली -अमोल रामा गुंड, समाधान बिभीषण गुंड, साहेबराव चांगदेव व नवनाथ रामा गुंड (सर्व रा. शेटफळ नागोबा,ता.करमाळा ) या चौघा संशयीत आरोपींविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील मुख्य संशयीत आरोपीला सोमवार पासून पोलीस कोठडी देण्यात आली आहे. इतर तीन संशयीत आरोपींना आज 29 डिसेंबर न्यायालयात हजर केले जाणार आहे .

इस्त्री केलेल्या कपड्यांची उधारी मागितली -मारहाण झालेले कृष्णा सोनटक्के यांचे शेटफळ नागोबा गावात पंक्चर काढायचे तसेच इस्त्रीचे दुकान आहे. सोमवारी म्हणजे 26 डिसेंबर रोजी कृष्णा याने आपल्या दुकानातील उदारी गुंड याना मागितल्यावर कृष्णा याला चार जणांनी लोखंडी गजाने मारहाण केली होती. या मारहाणीत जखमी झालेल्या कृष्णा याला उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . येथे कृष्णा याने दिलेल्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसात या चार आरोपींवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक गुंजवटी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details