महाराष्ट्र

maharashtra

शरद पवार यांना उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची जास्तच काळजी - शंभूराजे देसाई

By

Published : Sep 21, 2022, 3:37 PM IST

Updated : Sep 21, 2022, 4:14 PM IST

Etv Bharat

उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे जास्तच ऐकल्यामुळे आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ही अवस्था आहे, अशी टीका शंभुराजे देसाई यांनी केली. ते पंढरपूर येथील शासकीय विश्रागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

सोलापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात हिंदू गर्व गर्जना मेळावे घेण्यात येत आहेत. त्याच मेळाव्यासाठी उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई हे मंगळवार (दि. 19 सप्टेंबर)रोजी आले होते. पंढरपूर येथील शासकीय विश्रागृह येथे आयोजित पत्रकार परिषद मध्ये ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना उद्धव ठाकरे यांची जास्तच चिंता लागली आहे. उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचे जास्तच ऐकल्यामुळे आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ही अवस्था आहे, अशी टीका शंभुराजे देसाई यांनी केली आहे.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई पत्रकारांशी बोलताना

युती महाराष्ट्रातील जनतेलासुद्धा मान्य नव्हती - दसरा मेळाव्या संदर्भात बोलताना देसाई म्हणाले की, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाचे विचारांचे सोने लुटण्याचा अधिकार आम्हालाच आहे. उद्धव ठाकरे यांनी सेना भाजपची नैसगिर्क युती तोडून राष्ट्रवादी बरोबर अनैसर्गिक युती केली. असा आरोपही देसाई यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी केलेले युती महाराष्ट्रातील जनतेलासुद्धा मान्य नव्हती असही ते म्हणाले आहेत.

दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे - काल राज्यातील काही ग्रामपंचयतीचे निकाल लागले. त्याचे निकाल पाहिले तर भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पहिली तर आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत असेही देसाई यांनी सांगितले. पंढरपूर येथे संपन्न झालेल्या हिंदू गर्वगर्जना मेळाव्यामध्ये त्यांनी पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या पाच तारखेला दसरा मेळावा हा यशस्वी करण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले. कारण या दसऱ्या मेळाव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. त्यामुळे प्रत्येक संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांनी दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन हे शंभूराजे देसाई यांनी पंढरपूर येथे केले.

Last Updated :Sep 21, 2022, 4:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details