महाराष्ट्र

maharashtra

चंद्रकांत पाटलांनी तोंडातून पदवीधर शब्द देखील काढला नाही, आमदार लाड यांची टीका

By

Published : Sep 13, 2021, 7:23 AM IST

पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर मतदारसंघाचे नेृतृत्व करत असताना मतदारसंघासाठी काहीच काम केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही लाड यांनी माढा तालुक्यातील निमगाव येथे सांगितले.

पाटलांनी तोंडातून पदवीधर शब्द देखील काढला नाही, आमदार लाड यांची टीका
पाटलांनी तोंडातून पदवीधर शब्द देखील काढला नाही, आमदार लाड यांची टीका

माढा (सोलापूर) - पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. चंद्रकांत पाटील हे 2019 च्या निवडणुकीआधी दोन टर्म पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते, त्यावेळी त्यांनी मतदारसंघासाठी काहीच काम केले नाही, एवढेच नाही तर त्यांनी तोंडातून साधा पदवीधर हा शब्द देखील काढला नाही, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार लाड यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

आमदार लाड हे पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर शुक्रवारी(10 सप्टे) पहिल्यादाच माढा तालुक्यातील निंमगाव(टे)मध्ये आले होते. निमगावातील विठ्ठ्ल गंगा फार्मर्स प्रकल्पाच्या प्रयोग शाळेच्या भूमिपूजन समारंभ त्यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, धनराज शिंदे आदी उपस्थित होते.

पाटलांनी तोंडातून पदवीधर शब्द देखील काढला नाही, आमदार लाड यांची टीका


लाड म्हणाले, भाजपाचे चंद्रकात पाटील पुणे पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले. मात्र त्यांनी काही करुन दाखवले नाही. पदवीधर हा शब्द देखील तोंडुन उच्चारला गेला नाही. तीन कोटी रुपयांचा निधी पदवीधर मतदार संघाच्या वाटणीला येतो. त्यापैकी मागील टर्म मधील दीड कोटीचा निधी वापरला गेला नव्हता. टपाल देखील वाटले गेले नाहीत. हे दीड कोटी मी स्वत:ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे भांडुन पाठपुरावा करीत मिळवले असून ५ जिल्हे व ५८ तालुक्याकरिता दीड कोटी निधी खर्चण्यात येत असल्याचेही लाड यांनी सांगितले.

पदवीधारकाचे अनेक प्रलंबित प्रश्न असुन ते देखील सोडवण्यास प्राधान्य दिले जाईल. वैद्यकीय क्षेत्रात(मेडिकल) देखील अनेक जागा बऱ्याच वर्षांपासून रिक्तच आहेत. कर्मचारी अधिकारी स्टाॅफ मिळणे गरजेचा आहे. त्यासाठी भविष्यात आंदोलन करण्याची वेळ आली तरी ते करु, असे स्पष्टीकरणही आमदार लाड यांनी शेवटी बोलताना दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details